स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रीटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 03:51 PM2018-04-25T15:51:22+5:302018-04-25T15:51:22+5:30

कानडे मारुती लेन : रहिवासी व व्यावसायिकांचा पुढाकार

 Deleting unauthorized construction by self-managing collaboration | स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रीटीकरण

स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रीटीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देगावठाण परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडी व त्यातुन होणारे वाद ह्या बाबी नित्याच्याचरहिवासी व व्यापारी यांनी एकत्र येत कानडे मारूती लेनमधील ७ इमारतींचे १२ फुट नव्हे तर जवळपास ३ बाय ६० मीटर इतक्या जागेवरील वाढीव बांधकाम स्वेच्छेने काढून घेतले

नाशिक - महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रीटीकरण केले. रहिवासी व व्यावसायिकांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत असून त्यामुळे कानडे मारुती लेनमधील वाहतुक कोंडी सुटण्यासही मदत झाली आहे.
जुने नाशिक म्हणजेच गावठाण परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडी व त्यातुन होणारे वाद ह्या बाबी नित्याच्याच झालेल्या आहेत. कानडे मारु ती लेन ही अरुंद आहे. याठिकाणी रहिवासी व व्यापाऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करताना वाढीव जागेत ओट्यांचेही बांधकाम केले होते. त्यामुळे, अगोदरच अरुंद असलेल्या गल्लीत वाहन कोंडी होण्याबरोबरच वाहनतळाचीही अडचण होत होती. महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई होण्यापूर्वी परिसरातील रहिवासी व व्यापारी यांनी एकत्र येत कानडे मारूती लेनमधील ७ इमारतींचे १२ फुट नव्हे तर जवळपास ३ बाय ६० मीटर इतक्या जागेवरील वाढीव बांधकाम स्वेच्छेने काढून घेतले शिवाय, स्वखर्चाने रस्त्याचे रुदीकरण व कॉंक्रिटीकरण करु न परिसरातील वाहनतळ व वाहनकोंडीचा प्रश्न पुर्णत: निकाली काढला. बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम करतांना वाढीव जागेत ओट्यांच्या स्वरु पात बांधकाम केलेले होते . ही बाब मिळकतधारकांच्या लक्षात आल्यावर परिसरातील सर्व नागरिक व व्यापारी यांनी एकत्र येत सामंजस्याने आपापल्या इमारतींसमोरील वाढीव बांधकाम काढुन घेतले. सदर बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी अ‍ॅड. अक्षय कलंत्री , विनोद पोफळे , विवेक कुलकर्णी, अतुल मानकर , विलास देवकर, अतुल लोहिते, सतीष धात्रक, चिमन साधवानी, अनिश लालवानी यांनी पुढाकार घेतला.

Web Title:  Deleting unauthorized construction by self-managing collaboration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.