‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:54 PM2018-02-27T23:54:16+5:302018-02-27T23:54:16+5:30

लासलगाव : वनस्थळी ग्रामीण महिला व बाल विकास केंद्राच्या लासलगाव शाखेला मंगळवारी फ्रान्समधील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली.

A delegation of French delegation to the 'Wildest' rural women center | ‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट

‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट

Next

लासलगाव : वनस्थळी ग्रामीण महिला व बाल विकास केंद्राच्या लासलगाव शाखेला मंगळवारी फ्रान्समधील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी त्यांनी वनस्थळी संस्थेत काम करणाºया महिलांशी संवाद साधून संस्थेच्या कामाची माहिती जाणून घेतली. शिष्टमंडळातील मारी नोएल फ्रान्से, फ्रॉस्वा फुरशॉ, रेमॉद दा गिआॅस, इल्हम बुलासाल, स्टेफनी लेक्लेर, अ‍ॅनमारी दूरला यांचा वनस्थळीच्या भारती भिडे, शाखप्रमुख अनिता गंधे यांनी स्वागत केले. यावेळी वीणा दीक्षित, सायली कदम, मयूरी घाणेकर, प्रा. शिरीष गंधे, किशोर होळकर, प्रल्हाद खडांगळे, नुमान शेख, प्रा. विजय जैन, गजानन आहेर, अंकुश गरूड आदी उपस्थित होते.

Web Title: A delegation of French delegation to the 'Wildest' rural women center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.