मासे मारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:54 PM2018-10-20T17:54:21+5:302018-10-20T17:54:32+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील कादवा नदीत मासेमारी करणाºया भारत बळवंत जाधव रा. सिद्धार्थ नगर पिंपळगाव या आदिवासी युवकाचा मासे मारीच्या जाळीत पाय अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली.

The death of a teenager who fishes | मासे मारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू

मासे मारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू

Next

पिंपळगाव बसवंत : येथील कादवा नदीत मासेमारी करणाºया भारत बळवंत जाधव रा. सिद्धार्थ नगर पिंपळगाव या आदिवासी युवकाचा मासे मारीच्या जाळीत पाय अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली. या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे या घटनेबमुळे पिंपळगाव बसवंत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळगाव बसवंत सिद्धार्थ नगर येथील भारत बळवंत जाधव युवक सकाळच्या दरम्यान मासेमारी करत असताना पायात जाळ्यात
अडकल्याने कादवा नदी पात्रात पडला. काही काळानंतर हि घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच पिंपळगाव येथील अग्नीशमग दलास संपर्क साधला. सुनील मोरे घटना स्थळी पाचारण केले त्यांनी सदर इसमाला पाण्याच्या बाहेर काढले असता तो मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबत पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ वाघ करत आहे.

Web Title: The death of a teenager who fishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात