अपघातातील जखमी  दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:26 AM2018-10-17T01:26:47+5:302018-10-17T01:27:01+5:30

सिन्नर-नाशिक महामार्गावरील उद्योग भवनजवळील साईराज पेट्रोल पंपासमोर कंटेनरने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवार (दि. १३) रोजी नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते. त्यानंतर उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

 Death of injured couple in accident | अपघातातील जखमी  दाम्पत्याचा मृत्यू

अपघातातील जखमी  दाम्पत्याचा मृत्यू

Next

सिन्नर : सिन्नर-नाशिक महामार्गावरील उद्योग भवनजवळील साईराज पेट्रोल पंपासमोर कंटेनरने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवार (दि. १३) रोजी नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते. त्यानंतर उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.  येथील उद्योग भवन परिसरात राहणारे सुरेंद्र महादेव शिंगोटे (वय ३५, मूळ रा. मलकापूर, जळगाव) हे माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचएनजी कारखान्यात रोजंदारीवर कामाला होते. मुलगा तेजस याची तब्येत बरी नसल्याने ते शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी सकाळी ९ च्या दरम्यान शेजारी राहणाºया वाघ यांची दुचाकी(क्र. एम. एच. १५ ई. वाय. ५८३६) घेऊन ते पत्नी उषा (३४) मुलाला घेऊन दवाखान्यात जाण्यास निघाले. साईराज पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून ते सिन्नरकडे जाण्यासाठी वळत असताना नाशिककडून भरधाव येणाºया कंटेनर (क्र. एच. आर. १३, एम.१३५५)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. या दुचाकीचा अपघातात चक्काचूर झाला. मात्र मुलगा तेजस आश्चर्यकारक बचावला होता.
परिसरातील रहिवाशांनी तातडीने जखमींना नाशिकला हलविले. उपचार सुरू असताना उषा यांचे दुपारी ३ च्या सुमारास निधन झाले, तर सुनील यांची मृत्यूशी झुंज सुरू असताना रविवार (दि.१४) रोजी मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास हवालदार निरगुडे करीत आहेत.

Web Title:  Death of injured couple in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.