Asian Games 2018 : दत्तू भोकनळच्या तळेगावरोहीमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:39 AM2018-08-25T04:39:17+5:302018-08-25T07:00:07+5:30

Asian Games 2018 : नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा भारतीय लष्करातील जवान रोइंगपटू दत्तू बबन भोकनळ याने

Dattu bhokanal tale gahavateo dolalaya | Asian Games 2018 : दत्तू भोकनळच्या तळेगावरोहीमध्ये जल्लोष

Asian Games 2018 : दत्तू भोकनळच्या तळेगावरोहीमध्ये जल्लोष

Next

चांदवड : नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा भारतीय लष्करातील जवान रोइंगपटू दत्तू बबन भोकनळ याने आशियाई स्पर्धेत भारताच्या सांघिक सुवर्ण पदकामध्ये मोलाचे योगदाने दिले. त्याच्या या सुवर्ण यशानंतर तळेगावरोही ग्रामस्थांनी जल्लोषात आनंद साजरा केला.

आशियाई स्पर्धेत नौकानयनमध्ये वैयक्तिक पद हुकले असले तरी सांघिक पातळीवर मिळविलेल्या यशात दत्तूचाही सहभाग होता. दत्तूच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. दत्तूचे प्राथमिक शिक्षण तळेगावरोही येथील प्राथमिक शाळेत झाले होते. तर इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण तळेगावरोही येथीलच संत ज्ञानेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर सैन्य दलात असतांना गेल्यावर्षी त्याने इयत्ता बारावीची परीक्षा लासलगाव केंद्रातून दिली होती. सन २०१२ मध्ये दत्तूची लष्करात भरती झाली व पुणे येथे ट्रेनिंग सुरु असतांना त्याची रोइंगसाठी निवड झाली. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर दत्तूने हे यश मिळविल्याचे तळेगावरोहीचे जेष्ठ नागरीक सांगतात. त्याने आतापर्यंत २०१४मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपदमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच २०१५ मध्ये कोरीयात झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये पाचवे स्थान पटकावले होते. २०१५मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने जबरदस्त वर्चस्व राखताना सुवर्णपदक पटकावले. या जोरावर त्याची रिओ आॅलिम्पिकसाठी निवड झाली. २०१८ मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपदमध्ये सुवर्णपदक आणि आता जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक स्तरावर सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

दत्तूने परिवारासह, तळेगावरोहीच व संपूर्ण देशाचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले. त्यामुळे आमचा आंनद गगनात मावत नाही. त्याने यापुढेही देशासाठी अशीच कामगिरी करावी. - रामभाऊ भोकनळ, आजोबा दादाने पदकामागे पदके मिळविली आहेत. पण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळावण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत होतो. दत्तू दादा खूपच सराव करायचा. - गोकुळ भोकनळ, भाऊ

दत्तूने सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि आमची छाती गर्वाने फुगली. तो एशियन गेम्समध्ये निश्चितच चांगली कामगिरी करणार, याचा विश्वास होता. आई वडीलांची कृपा व आर्शिवाद आणि त्याचा आत्मविश्वास यामुळे सुवर्णपदक मिळाले.- शिवाजी पाटील, दत्तूचे शिक्षक

दत्तूने सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि आमची छाती गर्वाने फुगली. तो एशियन गेम्समध्ये निश्चितच चांगली कामगिरी करणार, याचा विश्वास होता. आई वडीलांची कृपा व आर्शिवाद आणि त्याचा आत्मविश्वास यामुळे सुवर्णपदक मिळाले.- शिवाजी पाटील, दत्तूचे शिक्षक

Web Title: Dattu bhokanal tale gahavateo dolalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा