बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:25 PM2019-04-30T19:25:03+5:302019-04-30T19:25:25+5:30

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ वर्षानुवर्षे पुजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजुर लावायची वेळेच येत नाही. ...

Dangerous drought in Baglan taluka! | बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता!

बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता!

googlenewsNext
ठळक मुद्देखमताणे : हाताला नाही काम, प्यायला नाही पाणी, मजुरांना फटका





खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ वर्षानुवर्षे पुजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजुर लावायची वेळेच येत नाही. पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दुध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मंजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहे.
नुकतेच ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले मजुर चालु वर्षी लवकर पट्टा पडल्याने घरी लवकर आले आहेत. कारखाना चालु असताना उपजीविका भागत होती, मात्र घरी आल्यानंतर एकेका कुटुंबात पाच सहा माणसे असल्याने उपजिविका भागवायची कशी हा प्रश्न दररोज कुटुंबप्रमुखांना सतावत आहे.
बांधकामाला लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यवसाय ९० टक्के बंद आहे . त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सिमेंट कामगार, बांधकाम कामगार, प्लबिंग, वीटभट्टीवरील मजुर कामगार अशा हजारो कारागीर व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने चित्र आहे.
गाव सोडून पोटा पाण्यासाठी ऊसतोडीवर गेलेले हे कामगार आता आपापल्या गावी परतु लागले आहे.
आजवर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या ऊसाच्या बांड्यांमुळे गुरांंच्या चारा-पाण्याचा काही काळासाठी का असेना मिटलेला प्रश्न आता मात्र या ऊसतोड कामगारांसाठी गंभीर ठरत आहे.
शहर व ग्रामीण भागात बांधकाम सुरू राहिल्यावर आमच्या छोट्या मालवाहू गाड्यांना दरवाजा, सिमेंट वाहतुकीसाठी भाडे मिळत असे. परंतु दुष्काळामुळे सर्व बांधकाम बंद झाल्याने छाट्या वाहनधारकांना उपासमारीची वेळ आली आहे.
- पप्पू पवार,
गाडीचालक, खमताणे.
ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार आता घरी परतत आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यां पाल्यांना ते घरीच ठेवत असल्याचा त्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.
- वैभव बागुल,
शेतकरी, खमताणे.

Web Title: Dangerous drought in Baglan taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.