ट्रॅक्टरखाली सापडून हवालदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:31 PM2017-12-20T23:31:34+5:302017-12-21T00:31:38+5:30

अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार अनिल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The custodial death of a tractor falling under the tractor | ट्रॅक्टरखाली सापडून हवालदाराचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली सापडून हवालदाराचा मृत्यू

Next

सटाणा : अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार अनिल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भाक्षी रोडवरील शरदनगरचे रहिवासी व मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल बन्सीलाल अहिरे (३९) हे आपल्या कर्तव्यावरून बुलेट मोटरसायकलने (एमएच ४१-९४४५) रात्री मालेगाव येथून सटाण्याकडे परतीच्या मार्गावर असताना जुनी शेमळीनजीक येणाºया टॅÑक्टरने समोरून जबर धडक दिल्याने अहिरे दुचाकीसह ट्रॅक्टरखाली सापडले. त्यांचे डोके चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. टॅÑक्टरचालक मात्र पसार झाला आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, नंदू पगार, मनसेचे पंकज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अहिरे यांना तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.  घटनेचे वृत्त कळताच अहिरे यांचे नातेवाईक, मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिरे यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल अहिरे यांच्या पश्चात त्यांचे वडील सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक बन्सीलाल अहिरे, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पोलीस हवालदार अहिरे हे मूळ देवळा तालुक्यातील वासोळ येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. २०) दुपारी
येथील ताहाराबाद रस्त्यावरील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तीन फैरी झाडून अहिरे यांना मानवंदना दिली. यावेळी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपनिरीक्षक गणेश बुवा, कृष्णा घायवट, पुंडलिक डांबाळे, संदीप गांगुर्डे यांच्यासह नगराध्यक्ष सुनील मोरे आदींनी श्रद्धांजली  अर्पण केली.

Web Title: The custodial death of a tractor falling under the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.