तीन गुन्हेगारी टोळ्यांसह ३३ सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:15 AM2018-01-30T01:15:11+5:302018-01-30T01:15:35+5:30

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहे़ तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, एमपीडीएची कारवाई करण्याबरोबरच ३३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई करण्यात आली आहे़

 The culprit on the 33rd convicted of three criminal groups | तीन गुन्हेगारी टोळ्यांसह ३३ सराईत गुन्हेगार तडीपार

तीन गुन्हेगारी टोळ्यांसह ३३ सराईत गुन्हेगार तडीपार

Next

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहे़ तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, एमपीडीएची कारवाई करण्याबरोबरच ३३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई करण्यात आली आहे़  पोलीस ठाण्यात दाखल प्रत्येक गुन्ह्याची संपूर्ण उकल व तक्रारदाराचे संपूर्ण समाधान करण्यावर आपला भर असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़ २०१७ या वर्षातील वार्षिक गुन्हेगारी व उकल याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़  शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांबाबत बोलताना सिंगल यांनी सांगितले की, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग या गुन्ह्यांमध्ये गत तीन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे़ मात्र हे गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच संशयितांना अटक करून, सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात शिक्षा कशी होईल यासाठी शहर पोलीस दल सतत प्रयत्नशील आहे़ याबरोबरच जबरी चोरी, दरोडा, चोरी, वाहनचोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी चोरलेला मुद्देमाल परत मिळवून तो पुन्हा नागरिकांकडे सोपविण्यात आला आहे़  नागरिक व पोलीस यांच्यातील संबंध चांगले व्हावेत यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, याचा गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी उपयोग झाला आहे़ आगामी कालावधीत आणखी लोकाभिमुख उपक्रम राबवून नागरिक व पोलीस यांच्यातील सुसंवादावर भर दिला जाणार असल्याचेही सिंगल यांनी सांगितले़ यावेळी शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व १४ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते़ 
न्यायालयातील दोषसिद्धतेत वाढ
 जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व विशेष न्यायालयांमध्ये दाखल खटल्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या संख्येत गत तीन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे़ २०१५ या वर्षात १५.५८ टक्के २०१६ मध्ये २१.५७ टक्के, तर २०१७ मध्ये २५.७४ टक्के आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे़, तर प्रथम वर्ग न्यायालयात २०१५ या वर्षात २५.३१ टक्के, २०१६ मध्ये ३३.२६ टक्के आणि २०१७ मध्ये ३८.१२ टक्के आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली आहे़ विशेष न्यायालयात २०१६ मध्ये ६७.७९ टक्के, २०१७ मध्ये ६८.९२ टक्के गुन्हे शाबित झाले आहेत. गुन्ह्यातील तपास अधिकारी व कर्मचाºयांनी केलेला सखोल तपास व सबळ पुरावे तसेच पैरवी अधिकारी व कर्मचाºयांकडून पंच व साक्षीदारांना केले जाणारे मार्गदर्शन तसेच सरकारी वकिलांनी मांडलेली बाजू यामुळे आरोपींना शिक्षा झाल्याचे सिंगल यांनी सांगितले़ 
महिला सुरक्षिततेसाठी उपक्रम 
‘पुन्हा घरी’ या शहर पोलीस आयुक्तालयाने राबविलेल्या उपक्रमामुळे कौटुंबिक कलहातील सुमारे १५० हून अधिक दाम्पत्याचा संसार सुरळीत झाला़ विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी मर्दानी स्कॉड, दामिनी पथक, मी माझी रक्षक याची निर्मिती करण्यात आली़ तसेच स्लम भागातील मुली व महिलांसाठी कार्यक्रम राबवून त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे़ महिलांच्या सुरक्षिततेसाठी ९७६२१००१०० ही हेल्पलाइन देखील सुरू आहे़ 
वाहतूक शाखेची कारवाईत वाढ
 विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºयांविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून, २०१७ मध्ये २२ हजार १६८ दुचाकीचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख ८४ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले़ याबरोबरच सिटबेल्ट न लावणाºया २५ हजार ५१ चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५० लाख १० हजार २०० रुपये, आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ७२४ चालकांकडून १८ लाख २९ हजार १० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. 
सव्वा कोटींचा मुद्देमाल परत 
पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालापैकी एक कोटी २९ लाख ३४ हजार ४१३ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने परत करण्यात आला आहे़ या मुद्देमालामध्ये ४५ लाख ८ हजार ८०३ रुपयांचे दागिने, ६२ लाख ९५ हजार रुपयांची वाहने, चार लाख ७७ हजार ९०० रुपयांचे मोबाइल आणि १६ लाख ५२ हजार ७१० रुपयांचा इतर मुद्देमालाचा समावेश आहे.

Web Title:  The culprit on the 33rd convicted of three criminal groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.