परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:11 AM2017-10-13T00:11:09+5:302017-10-13T00:11:18+5:30

परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Crop damage by return rains | परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

Next

आघार : परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
आघार बुद्रुक, ढवळेश्वर, पांढरूण, बेनगाव परिसरात जूनपासून अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे मका पिकाची दुबार पेरणी करावी लागली होती. वेळेवर पाऊस न आल्याने मका पिकाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली आहे. कणीस मोठे प्रमाणात न येता छोटे-छोटे मका कणीस शेतात आहेत. तसेच बाजरी पीकही शेतकºयांनी कमी प्रमाणात पेरणी केलेली होती. सध्या शेतकºयांनी मजुरांकडून मका, बाजरी, पिकांची काढणी केलेली आहे. बाजरी, मका कणीस शेतात असताना परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून थैमान घातले आहे. त्यामुळे मका, बाजरी कणीस पावसात भिजून कणसाला कोंब फुटत आहेत. आधीच उत्पादनात घट झालेली असताना परतीच्या पावसाच्या पुन्हा आगमनामुळे शेतकºयांचे मका, बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे. कांदा पिकाची गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतकºयांनी लागण केली आहे. कांदा पिकाचेदेखील पावसामुळे नुकसान होत आहे. कांदा पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने शेतकºयांना पीक नुकसानभरपाई अनुदान द्यावे. सदर पिकांचा पंचनामा व्हावा तसेच पीक विमादेखील शेतकºयांनी काढलेला आहे. त्यांनाही पीक नुकसान विमा मंजूर करावा तसेच दिवाळीपूर्वी शासनाने सरसकट कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकरी रमेश हिरे, भाऊसाहेब हिरे, संतोष सावंत, प्रभाकर सावंत, दिलीप निकम, विठ्ठल खैरनार आदींनी केली आहे.

Web Title: Crop damage by return rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.