मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दुचाकीचालक मातेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 05:53 PM2019-01-08T17:53:16+5:302019-01-08T17:53:40+5:30

नाशिक : पाथर्डी रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव अ‍ॅक्टिवा दुचाकी जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात साडेतीन वर्षाच्या गौरेश सानप या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अ‍ॅक्टिवा चालविणारी गौरेशची आई माधुरी सानप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

 Crime on a motorist due to child's death | मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दुचाकीचालक मातेवर गुन्हा

मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दुचाकीचालक मातेवर गुन्हा

Next
ठळक मुद्देअ‍ॅक्टिवा दुचाकी अपघात

नाशिक : पाथर्डी रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव अ‍ॅक्टिवा दुचाकी जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात साडेतीन वर्षाच्या गौरेश सानप या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अ‍ॅक्टिवा चालविणारी गौरेशची आई माधुरी सानप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास माधुरी सानप या मुलगा गौरेशसोबत अ‍ॅक्टिवा (एमएच १५, इ डब्ल्यू ०७३३) दुचाकीने पाथर्डी फाट्याकडून घराकडे जात होत्या़ त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (केए ३२, डी ३६८७) पाठीमागून जाऊन आदळली़

या अपघातात अ‍ॅक्टिवा दुचाकीवर पुढे बसलेल्या गौरेशच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याची आई माधुरी सानप या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे़ या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश दांडगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़

Web Title:  Crime on a motorist due to child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.