निर्णायक वळणावरही अस्थिरता कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:56 AM2018-05-19T01:56:16+5:302018-05-19T01:56:16+5:30

नाशिक : भाजपाने गुलदस्त्यात ठेवलेली राजकीय भूमिका, त्यामुळे शिवसेनेला फुटलेला घाम व राष्टÑवादीने प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.

Constant turnover instability persists! | निर्णायक वळणावरही अस्थिरता कायम!

निर्णायक वळणावरही अस्थिरता कायम!

Next
ठळक मुद्देकोणते ‘कार्ड’ चालते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून सेनेच्या मतदारांना अज्ञातस्थळी हलवून त्यांचा ‘संपर्क’ तोडला

नाशिक : भाजपाने गुलदस्त्यात ठेवलेली राजकीय भूमिका, त्यामुळे शिवसेनेला फुटलेला घाम व राष्टÑवादीने प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. सेनेंतर्गत उमेदवारीवरून सुप्त नाराजी घालविण्याचे हरतºहेचे प्रयत्न करतानाच दगाफटका टाळण्यासाठी मतदारांना अज्ञातस्थळी नेणे, या उलट कॉँग्रेस आघाडीने मतदारांना मोकळे सोडून त्यांच्यावर विश्वास प्रकट करणे, तर भाजपाने आपल्या सदस्यांना सर्वच पर्याय खुले ठेवल्यामुळे निवडणुकीत कोणते ‘कार्ड’ चालते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. राज्य विधान परिषदेचे सभापतिपद व विरोधी पक्षनेतेपद आगामी काळातही पक्षाच्या ताब्यात ठेवण्याचा भाग म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीला अधिक गांभीर्याने घेऊन त्यादृष्टीने नाशिक मतदारसंघात राजकीय डावपेच आखले आहेत. पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लागोपाठ केलेले दौरे व रुग्णालयात दाखल असूनही छगन भुजबळ यांचे या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर असलेले लक्ष पाहता राष्टÑवादीने या निवडणुकीला प्रतिष्ठेची करत उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या पाठीशी बळ उभे केले आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची उमेदवारी घोषित करून मित्रपक्ष भाजपावर आघाडी घेतली. परिणामी विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यावी याची चाचपणी भाजपा करीत असतानाच सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याबरोबरच संख्याबळाची आकडेवारी न सांगता दराडे यांना निवडून आणा, असा दमच स्वकीयांना भरला. परिणामी पक्षांतर्गत खदखद कमी होण्याऐवजी नाराजी वाढतच गेली. यावर उपाय म्हणून गेल्या आठ दिवसांपासून सेनेच्या मतदारांना अज्ञातस्थळी हलवून त्यांचा ‘संपर्क’ तोडला गेला आहे. भाजपाची या निवडणुकीतील भूमिका अद्यापही स्पष्ट होऊ शकली नसली तरी, त्यांनी जिल्हा विकास आघाडीच्या नावे परवेज कोकणी यांना रिंगणात उतरवून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. कोकणी यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी न देता युती धर्म पाळल्याचे चित्र रंगवले खरे, परंतु कोकणी यांच्या नामांकन अर्जावर भाजपा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या पाहून भाजपाची खेळी शिवसेनेच्याही लक्षात आली आहे. असे असले तरी, संपूर्ण भाजपा कोकणी यांच्या पाठीशी उभी असल्याचेही चित्र मात्र दिसत नाही. तीन दिवसांपूर्वी भाजपाच्या सर्वच मतदारांना ‘वर्षा’वर पाचारण करून मुख्यमंत्र्यांनी ‘योग्यवेळी योग्य निर्णय’ घेण्यात येईल, असे सांगितले, परंतु अद्यापही हा निर्णय झालेला नाही. या उलट राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी आयोजित स्नेहभोजनासाठी भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी लावलेली हजेरी पाहता, राष्टÑवादी-भाजपाची छुपी युती झाल्याची चर्चा पसरविण्यात व शिवसेनेला खिजविण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. अशा दोलायमान राजकीय परिस्थितीत मतदानाला अवघे ४८ तास शिल्लक असताना व सर्वच राजकीय पक्ष वा उमेदवार निवडणूक निकालाविषयी छातीठोक दावा करीत असले तरी पराभवाची सुप्त भीतीही त्यात आहे.

Web Title: Constant turnover instability persists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.