शाळांच्या सुट्यांचा गोंधळ

By admin | Published: November 25, 2015 11:43 PM2015-11-25T23:43:06+5:302015-11-25T23:43:47+5:30

आदेशाचा संभ्रम : काही शाळा सुरू तर काही डिसेंबरमध्ये

Confusion of School Suspension | शाळांच्या सुट्यांचा गोंधळ

शाळांच्या सुट्यांचा गोंधळ

Next

नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीच्या कालावधीतील सुट्या समायोजित करताना शहरातील शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळी सुटीनंतर शाळा कधी सुरू कराव्या याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे सुस्पष्ट आदेश नव्हते अथवा त्यांच्या आदेशाचे आकलन झाले नाही परंतु काही माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. काही शाळा गुरुवारी (दि. २६) सुरू होणार आहेत, तर काही शाळा चक्क २ डिसेंबर रोजी सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.
या शाळांच्या गोंधळामुळे अनेक शाळांमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रमच होणार नसल्याचे वृत्त असून या गोंधळाला जबाबदार कोण यावरून संघटना अधिकाऱ्यांनाच दोषी धरत आहेत. यंदा नाशिक शहरात कुंभमेळा असल्याने तीन पर्वण्यांच्या दरम्यान पोलिसांनी वाहतूक निर्बंध घातले. त्यामुळे तीन पर्वण्या मिळून किमान सहा ते नऊ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या सुट्या दिवाळी सुट्टीतून वगळण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थाचालकांना कळविले होते; मात्र प्रत्यक्षात संस्थाचालकांचा गोंधळ उडाला. काही शाळा या २३ रोजी सुरू झाल्या, तर काही २६ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत.

Web Title: Confusion of School Suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.