कर्मचारी निलंबनावरून  थेट रोहयो मंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:12 AM2018-05-30T01:12:03+5:302018-05-30T01:12:03+5:30

 Complaint from the employee suspension directly to the ROI minister | कर्मचारी निलंबनावरून  थेट रोहयो मंत्र्यांकडे तक्रार

कर्मचारी निलंबनावरून  थेट रोहयो मंत्र्यांकडे तक्रार

Next

नाशिक : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला बेकायदेशीर निलंबित करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्या विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारी या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत जाऊन रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत गाºहाणे मांडले आहे.  कर्मचायांच्या निलंबनावरून जिल्हाधिकारी राधाकृष्णन् व गिते यांच्यातही खडाजंगी होऊन गिते यांनी जिल्हाधिकाºयांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाले आहे. मालेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामासाठी मानधनावर नेमण्यात आलेले तिघे कर्मचारी अधिकृत रजेवर असताना नरेश गिते यांनी ते गैरहजर असल्याच्या कारणावरून निलंबित केले आहेत. मानधनावर कर्मचारी नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना असून, या कर्मचाºयांच्या सेवाविषयक बाबीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयच हाताळते असे असतानाही गिते यांनी तिघा कर्मचाºयांना निलंबित करण्याची बाब जिल्हाधिकाºयांना चांगलीच खटकली व त्यांनी गिते यांना त्या कर्मचाºयांना पुन्हा कामावर घेण्याच्या सूचनाही केल्या. परंतु तसे केल्यास जिल्हा परिषदेत अन्य कारणांवरून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांच्याबाबतदेखील तोच निर्र्णय घ्यावा लागेल, असे गिते यांचे म्हणणे असल्याने त्यांनी या कर्मचाºयांची तीन महिन्यांत चौकशी करून नंतर त्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. मुळात या कर्मचाºयांची चौकशी करण्यासारखे काहीच नाही व तो अधिकार जिल्हा परिषदेला नसल्याचे जिल्हाधिकाºयांचे म्हणणे आहे. परंतु नरेश गिते यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्णातील रोहयो कंत्राटी कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कर्मचारी संपावर जाणार?
सध्या जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर गेले असून, त्यानंतर गिते हेदेखील प्रशिक्षणासाठी जाणार असल्याची चर्चा आहे तसे झाल्यास या कर्मचाºयांबाबत कोण निर्णय घेणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यामुळे मंगळवारी कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या काही पदाधिकाºयांनी मुंबईत जाऊन जयकुमार रावल यांच्या कानी सदरचा प्रकार घातला आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्ह्णातील कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Complaint from the employee suspension directly to the ROI minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.