आरोग्यसेविकांनी रडत वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:45 PM2018-12-05T17:45:12+5:302018-12-05T17:46:32+5:30

सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिरश्मी बुकाने या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या आरोप करीत केंद्रातील कर्मचाºयांसह आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काम करीत आंदोलनास प्रारंभ केला.

Complain of complaints of healthcare workers | आरोग्यसेविकांनी रडत वाचला तक्रारींचा पाढा

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयाच्या त्रासाला कंटाळून आरोग्य सेविका, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. त्यावेळी त्यांच्यासोबत चर्चा करतांना जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, युवा नेते उदय सांगळे, सरपंच नंदा गावडे, विजय काटे, दीपक वेलजाळी, ईलाहीबक्ष शेख यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी.

Next
ठळक मुद्देवावी केंद्र : वैद्यकीय अधिकारी त्रास देत असल्याने काळ्या फिती लावून आंदोलन

सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिरश्मी बुकाने या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या आरोप करीत केंद्रातील कर्मचाºयांसह आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काम करीत आंदोलनास प्रारंभ केला.
आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत आरोग्य सेविकांसह व आशा कार्यकर्त्यांनी अक्षरश: रडत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर आरोग्य अधिकाºयांच्या तक्रारींचा पाढा वाचला. डॉ. बुकाने या आरोग्य सेविका, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासह जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करीत आरोग्य सेविका, सहाय्यक, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास प्रारंभ केला. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उदय सांगळे, वावीच्या सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे, सदस्य ईलाहीबक्ष शेख, दीपक वेलजाळी, आदींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. प्रवेशद्वारातच आरोग्य सेविका, सहाय्यक, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. जिल्हा परिषद या सदस्यांना कहाताच आंदोलनकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास प्रारंभ केला. हे सांगताना आरोग्य सेविका अक्षरश: रडत असल्याचे चित्र होते. वैद्यकीय अधिकारी बुकाने या हेतूपुरस्कार त्रास देणे, धमकी देणे, मानसिक त्रास देणे करीत असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगितले. बुकाने या सकाळी ११ वाजता येतात व दुपारी ४ वाजता निघून जातात. रात्रीच्यावेळी प्रस्तूतीसाठी येणाºया महिलांची व रुग्णांची गैरसोय असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकाºयांच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर त्या गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बुकाने यांची बदली करुन येथे पर्याय वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी कर्मचाºयांनी केली किंवा आमच्या सर्वांची बदली करा असेही सांगितले. बुकाने यांची तातडीने बदली करुन येथे अन्य दुसºया वैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करण्याची सामुदायिक मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सांगळे व केदार यांनी रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य सेविका व कर्मचाºयांना केले. कर्मचाºयांचे मागण्यांचे निवेदन व भावना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहच करणार असल्याचे आश्वासन केदार व सांगळे यांनी दिले. आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांना गोवर व रुबेला लसीकरणाच्या कामावर जाण्याची विनंती केली. त्यानंतर कर्मचाºयांनी ठिय्या आंदोलन मागे घेत लसीकरणाच्या कामावर जाणे पसंत केले. निवेदनावर आरोग्य सेविका यांच्यासह अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांच्या स्वाक्षºया आहेत.
चौकट- लसीकरणास प्रारंभवावीच्या आरोग्य सेविका आणि कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांच्या भावना व मागण्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाºयांनी गोवर व रुबेला लसीकरणाच्या कामास प्रारंभ केला.

Web Title: Complain of complaints of healthcare workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.