नातेवाइकाच्या बदलीवरून शिक्षणाधिकाऱ्यांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:01 PM2019-07-03T23:01:02+5:302019-07-03T23:01:30+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी स्वत:च्या शिक्षक भावजईची दुर्गम ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. मात्र सदरची बदली ही नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच केली गेल्याचा दावा झनकर यांनी केला आहे.

Commentary on educators from relative relation | नातेवाइकाच्या बदलीवरून शिक्षणाधिकाऱ्यांवर टीका

नातेवाइकाच्या बदलीवरून शिक्षणाधिकाऱ्यांवर टीका

Next
ठळक मुद्देसोशल माध्यमावर व्हायरल : अधिकाऱ्यांकडून मात्र इन्कार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी स्वत:च्या शिक्षक भावजईची दुर्गम ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. मात्र सदरची बदली ही नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच केली गेल्याचा दावा झनकर यांनी केला आहे.
शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या भावजई ऊर्मिला उशीर यांची मागील वर्षी पेठ तालुक्यातील काळुस्ते या गावातील शाळेत जिल्हांतर्गत आॅनलाइनने बदली झाली होती. विस्थापित गटात त्यांची बदली झाल्यामुळे त्या कोळुस्ते येथे रुजू झाल्या होत्या. मात्र वर्षभरातच यंदाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये उशीर यांची बदली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी येथे झाली आहे. मुरंबी येथे बदली झाल्यानंतर दुसºयाच दिवशी तेथे हजर होऊन दुसºया दिवशी जिल्हा संशोधन व प्रशिक्षण संस्था नाशिक (डायट)कडे तंत्रस्नेही म्हणून प्रतिनियुक्तीवर रुजू झाल्या आहेत. पेसा क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर घेता येत नाही. असे असताना ऊर्मिला उशीर यांची प्रतिनियुक्ती झालीच कशी, असा सवाल करण्यात आला आहे. डायट संस्थेकडे प्रतिनियुक्तीवर घेतल्या जाणाºया शिक्षकांची विद्या प्राधिकरण (एमएससीईटी) पुणे यांच्याकडून मुलाखती घेऊन नेमणूक केली जाते. चालू वर्षी अद्याप तशी प्रक्रिया राबविली गेली नसताना ऊर्मिला उशीर यांची नेमणूक थेट करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे सध्या डायट प्राचार्य पदाचा
ई-चार्ज आहे. त्यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग करून ही बदली
केल्याचा आरोप केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल केली जात असून, त्याद्वारे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्हा परिषदेने गेल्या महिन्यात १३८८ आॅनलाइन बदल्या केल्या असून, त्यानंतर जवळपास ३५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु यातील एकाही बदलीबाबत तक्रार समोर आलेली नाही. अशातच शिक्षणाधिकाºयांची नातेवाईक म्हणून एकमेव बदलीचे प्रकरण पुढे आले आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी झनकर यांना विचारणा केली असता, शिक्षक ऊर्मिला उशीर यांची गेल्या वर्षी विस्थापित गटात पेठ तालुक्यात बदली झाली होती. त्याचवेळी त्यांनी डायटकडे प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला होता. उशीर यांच्यासह तिघांनी असे अर्ज केले होते. त्यातील एकाने नंतर अर्ज मागे घेतला व उशीर यांचा अर्ज कायम राहिला. यंदा शिक्षकांच्या बदल्या करताना गेल्या वर्षी जे विस्थापित शिक्षक झाले त्यांना प्राधान्य देण्यात आले होते. ही सारी प्रक्रिया कायदेशीर व नियमानुसार पार पडली असून, त्यात नातेवाइकाला कोणताही गैरवापर करण्यात आला नसल्याचे झनकर यांनी सांगितले.‘त्या’ गटशिक्षणाधिकाºयांना नोटीसदेवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शाळेत शिक्षक नेमणुकीवरून पालकाने संवाद साधला असता देवळ्याच्या गटशिक्षणाधिकारी धनगर यांनी उर्मटपणे उत्तरे दिल्याची आॅडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी झनकर यांनी गटशिक्षणाधिकारी धनगर यांना शो कॉज नोटीस बजावली आहे.

Web Title: Commentary on educators from relative relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.