सहकारी बॅँकांची शक्कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:44 PM2019-03-15T23:44:01+5:302019-03-16T00:33:34+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.

Co-operative Banks! | सहकारी बॅँकांची शक्कल !

सहकारी बॅँकांची शक्कल !

Next
ठळक मुद्देनिवडणूक : वाहन जप्ती टाळण्यासाठी स्टिकर काढून वसुलीसाठी वापर

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.
मार्च महिना हा बॅँकेच्या आर्थिक वर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, एरव्ही वर्षभर थकबाकीदार, कर्जदारांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बॅँका मात्र मार्च महिन्यात पैसे वसुलीसाठी तगादा लावला जातो, त्यासाठी बॅँकांकडूनच विशेष वसुली पथक गठीत करून बॅँकेच्या वाहनाने गावोगावच्या कर्जदारांच्या घरी जावून वसुली केले जाते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे नियमानुसार सहकारी संस्था व सहकारी बॅँकांनाही त्यांची वाहने शासन जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना सहकार विभागाने सर्व सहकारी बॅँका व संस्थांना दिल्या आहेत. प्रत्येक बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांबरोबरच वसुलीसाठी तीन ते चार वाहने असतात. लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता, संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाला सुमारे तीन हजारांहून अधिक वाहनांची गरज आहे. परंतु निवडणूक आचारसंहिता जारी होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्हा बॅँकेसह शहरातील नामको, जनलक्ष्मी, गोदावरी, राजलक्ष्मी, विश्वास आदी सहकारी बॅँकांनी त्यांची वाहने जमा केली नसल्याची बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आली आहेत. विशेष म्हणजे यातील काही बॅँकांनी आपल्याकडे वाहनेच नाहीत असा पवित्रा घेतला, परंतु त्यांची वसुली पथके मात्र वाहने घेऊन राजरोस फिरत असल्याचे चित्र आहे.
कारवाई होण्याची शक्यता
सहकार विभागाने बजावूनही जर या बॅँकांनी वाहने जमा केली नाहीत, तर आरटीओमार्फत ती जेथे असतील तेथून ताब्यात घेण्याची कार्यवाही होऊ शकते याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे या बॅँकांनीही नवीन शक्कल लढविली असून, वसुलीसाठी फिरणाºया बॅँकांच्या वाहनांवर बॅँकेच्या नावाचे असलेले स्टिकर काढून टाकले आहेत. जेणे करून वाहन बॅँकेचे आहे, याचा खुलासा होणे कठीण झाले आहे.

Web Title: Co-operative Banks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.