शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:52 AM2018-12-26T00:52:43+5:302018-12-26T00:53:29+5:30

‘गुरे वासरे देती हुंबारा, नीजे गव्हानीत तारणारा, मारिया माता बाळाची माता करी जिवापाड सांभाळ, चला एकीने साजरा करूया नाताळ...’

 In the city celebrates the birth of Lord Jesus | शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा

शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा

googlenewsNext

नाशिक : ‘गुरे वासरे देती हुंबारा, नीजे गव्हानीत तारणारा, मारिया माता बाळाची माता करी जिवापाड सांभाळ, चला एकीने साजरा करूया नाताळ...’ असे नाताळ गीतगायन करत प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव ख्रिस्ती समाजबांधवांनी उत्साहात साजरा केला. यानिमित्त सकाळी ‘मिस्सा’ या सामूहिक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी उसळली होती.
मानवजातीच्या कल्याणासाठी पृथ्वीतलावर अवतरलेल्या प्रभू येशूचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमसचा सण शहरात विविध धार्मिक व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील संत आंद्रिया, होली क्रॉस, सेंट थॉमस या चर्चमध्ये सकाळी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य धर्मगुरू फादर रेव्हरंट अनंत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंद्रिया चर्चमध्ये ‘मिस्सा’चे पठण करण्यात आले. यावेळी भाविकांच्या गर्दीने चर्च हाउसफुल्ल झाले होते. पर्यायी व्यवस्था चर्चच्या आवारात करण्यात आली होती; मात्र ती व्यवस्थाही अपुरी पडली.  संध्याकाळी साडेसहा वाजता नाताळ गीतगायनाचा कार्यक्रम चर्चच्या आवारात पार पडला. यावेळी चर्चच्या सदस्यांनी विविध नाताळ गीतांमधून प्रभू येशूंच्या जन्माचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. येशू ख्रिस्ताचे ज्येष्ठ शिष्य संत आंद्रिया यांचे नाव येथील ऐतिहासिक चर्चला देण्यात आले आहे. चर्चच्या बाहेर येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचा गव्हाणीचा देखावा सादर करण्यात आला आहे. तसेच विविध वचने प्रदर्शित करण्यात आली आहेत. मानवी जीवन सुखकारक करणारे प्रभू येशूच्या संदेशाची वचने चर्चच्या आवारात लावण्यात आली आहे.
त्र्यंबक नाक्यावरील होली क्रॉस चर्चमध्ये फादर केनेथ यांच्या मार्गदर्शनाखाली द्विभाषिक ‘मिस्सा’ प्रार्थनेचे सकाळी पठण करण्यात आले. चर्च भाविकांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. यावेळी प्रार्थनेसाठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला. यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला होता.
नाताळ गीतांची मैफल
आंद्रिया चर्चमध्ये संध्याकाळी ‘युथ विथ अ व्हिजन’ ग्रुपच्या वतीने नाताळ गीतांची मैफल रंगविण्यात आली. या मैफलीत मसिहा के खयालो..., आनंदले सारे मनी..., शोर दुनिया में..., राजाओ का राजा..., विजयी हुवा विजयी हुवा..., तेरा हो अभिषेक..., असे विविध स्तुतीपर नाताळ गिते सादर करून उपस्थित शेकडो भाविकांना तल्लीन केले. चर्चच्या आवारात मंगळवारी संध्याकाळी रंगलेल्या या ‘नाताळ गीत संध्या’ सांस्कृतिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गायक राके श कुºहाडे, प्रतीक लोंढे, आलिशा, प्रितीशा यांना शरद वैद्य, अजय म्हस्के (की-बोर्ड), आदेश बोर्डे (ड्रम सेट) यांनी साथसंगत केली.
तरुणाई सेल्फीच्या प्रेमात
आंद्रिया चर्चमध्ये सादर करण्यात आलेल्या गव्हाणीचा देखावा, विद्युत रोषणाईने साकारलेले ख्रिसमस-ट्री, सायकलस्वार सांताच्या देखाव्यांसह चर्चवर करण्यात आलेल्या रोषणाईसोबत तरुणाईने ‘सेल्फी’घेत सोशल मीडियावर पोस्ट केली. संध्याकाळी मोठ्या संख्येने युवक-युवतींची गर्दी उसळली होती. आकर्षक रोषणाईने नटलेल्या चर्च परिसराची सगळ्यांनाच भुरळ पडल्याचे दिसून आले.
‘मिस्सा’ प्रार्थनेसाठी गर्दी
येशू ख्रिस्ताचे ज्येष्ठ शिष्य संत आंद्रिया यांचे नाव येथील ऐतिहासिक चर्चला देण्यात आले आहे. चर्चच्या बाहेर येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचा गव्हाणीचा देखावा सादर करण्यात आला आहे. तसेच विविध वचने प्रदर्शित करण्यात आली आहेत. मानवी जीवन सुखकारक करणारे प्रभू येशूच्या संदेशाची वचने चर्चच्या आवारात लावण्यात आली आहे.
४त्र्यंबक नाक्यावरील होली क्रॉस चर्चमध्ये फादर केनेथ यांच्या मार्गदर्शनाखाली द्विभाषिक ‘मिस्सा’ प्रार्थनेचे सकाळी पठण करण्यात आले. चर्च भाविकांसाठी रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. यावेळी प्रार्थनेसाठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title:  In the city celebrates the birth of Lord Jesus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.