पोटनिवडणुकीची तयारी पुर्ण ; दुसऱ्या दिवशी नामांकन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:14 AM2019-06-01T00:14:31+5:302019-06-01T00:15:51+5:30

प्रशासनाने सातपूर प्रभाग क्रमांक १० डच्या पोटनिवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे. प्रभागातील आठ मतदान केंद्रातील ३६ बुथवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 Bye-election preparations complete; The next day there is no nomination | पोटनिवडणुकीची तयारी पुर्ण ; दुसऱ्या दिवशी नामांकन नाही

पोटनिवडणुकीची तयारी पुर्ण ; दुसऱ्या दिवशी नामांकन नाही

Next

सातपूर : प्रशासनाने सातपूर प्रभाग क्रमांक १० डच्या पोटनिवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे. प्रभागातील आठ मतदान केंद्रातील ३६ बुथवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही एकही नाामांकन दाखल झाले नाही.
प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक सुदाम नागरे यांचे अल्पश: आजाराने निधन झाल्याने या रिक्त जागेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने ३० मेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ६ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर ७ रोजी छाननी करण्यात येणार आहे. सोमवार १० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असणार आहे.
रविवार दि. २३ रोजी मतदान घेण्यात येणार असून, दुसºया दिवशी सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिली.
या पोटनिवडणुकीसाठी १८० नियमित कर्मचारी व १० टक्के राखीव कर्मचारी असे एकूण २२५ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. प्रभागातील १५ हजार ७४८ पुरुष व १२ हजार ८०४ स्त्री मतदार आणि इतर ४ असे एकूण २८ हजार ५५६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
बिनविरोधसाठी प्रयत्न
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसºया दिवशीदेखील एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. भाजपाकडून दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांना उमेदवारी दिली जाणार असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे आमदार प्रयत्नशील आहे, तर ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

Web Title:  Bye-election preparations complete; The next day there is no nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.