सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल गणेशभक्तांकडून सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 06:19 PM2018-09-13T18:19:57+5:302018-09-13T18:24:01+5:30

गणेशोत्सवात आरासासोबतच गणेशमूर्तींची सजावटीचा एक महत्त्वाचा असून मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी गणेशभक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्या-चांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्तीला प्रेमाने, हौसेने दागिने केले जातात, तसेच दागिने गणपतीलाही केले जातात. त्यामुळेचे गणरायांसाठी विविध सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केली

Buy gold and silver jewelery from jewelers | सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल गणेशभक्तांकडून सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी

सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल गणेशभक्तांकडून सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी

Next
ठळक मुद्देगणपती बप्पांसाठी सोने चांदीचे दागिनेमुकुट, कडे, कंठी, सोंडपट्टी, कमरपट्टा, मोदक, पंचपात्राला पसंती सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : गणेशोत्सवात आरासासोबतच गणेशमूर्तींची सजावटीचा एक महत्त्वाचा असून मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी गणेशभक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्या-चांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्तीला प्रेमाने, हौसेने दागिने केले जातात, तसेच दागिने गणपतीलाही केले जातात. त्यामुळेचे गणरायांसाठी विविध सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केली. त्यामुळे सराफ बाजारातचगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली असून, गणेशचतुर्थीच्या दिवशीही गणपत्ती बाप्पांना मुकुटसह विविध दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. गणपतीसाठी सोन्या-चांदीतील मुकुट, कडे, कंठी, भीकबाळी, सोंडपट्टी, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जानवं, बाजूबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप उपरणं, सोन्याचे पाणी दिलेले चांदीचे मोदक, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू  आदि विविध वस्तुंसह चांदीचा ड्रायफ्रूट सेट, सोन्याचे पाणी दिलेली फळे, कान, उंदीर, परशू असे विविध प्रकारचे दागिने आणि  पूजेतील विविध प्रकारच्या वस्तंूची ग्राहकांनी खरेदी केली. त्याचप्रमाणे आजकाल मित्रांकडे, नातेवाइकांकडे गणेशदर्शनासाठी जाताना भेटवस्तू म्हणूनदेखील चांदी-सोन्यातील वस्तू घेऊन जाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गणपत्ती बापांशी संबंधित विविध सोन्या-चांदीच्या वस्तुंना मागणी वाढली आहे. सोन्या-चांदीच्या किमती सतत चढ्याच राहत असल्यामुळे एकाच वेळी सगळे दागिने करणेही गणेशभक्तांना शक्य नसते. त्यामुळे सर्वसामान्य लोक सहसा दरवर्षी एखादा नवीन दागिन्याची खरेदी  करतात. त्यामुळे गणपतीसाठीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या, वस्तूंच्या बाजारपेठेत गणपतीच्या काळात कोट्यवधींची उलाढाल होण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांना आहे.

यावर्षी गणपतीचा मुकुट आणि फुलांना जास्त मागणी आहे. सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे सुर्णकारांनी गणपतीचे कमी वजनाचे दागिने आणि पूजेतील वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चांदीत सजावट करायला लोकांना आवडते. त्यामुळे बाप्पांसाठी चांदीचे चौरंग, चांदीमधली फुलं, देव्हारे यांची लोक खरेदी करत केल्याचे सराफांनी सांगितले. 

Web Title: Buy gold and silver jewelery from jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.