खूनप्रकरणी जावयाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:51 PM2019-05-04T23:51:57+5:302019-05-04T23:52:28+5:30

नाशिक : आपल्या सासऱ्याच्या डोक्यात जावयाने दगड घालून खुरपीने हल्ला चढवून ठार मारल्याची घटना नांदूरशिंगोटे गावाच्या शिवारात २०१३ साली घडली होती. या गुन्ह्णात फरार झालेल्या संशयिताला पाच वर्षांनंतर अटक करण्यास पोलिसांना यश आले होते. संशयित आरोपी सोमनाथ फुलाजी मोरे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी शनिवारी (दि.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Born to death in a murder case | खूनप्रकरणी जावयाला जन्मठेप

खूनप्रकरणी जावयाला जन्मठेप

Next
ठळक मुद्देजिल्हा न्यायालय : पाच वर्षांनंतर संशयिताला झाली होती अटक

नाशिक : आपल्या सासऱ्याच्या डोक्यात जावयाने दगड घालून खुरपीने हल्ला चढवून ठार मारल्याची घटना नांदूरशिंगोटे गावाच्या शिवारात २०१३ साली घडली होती. या गुन्ह्णात फरार झालेल्या संशयिताला पाच वर्षांनंतर अटक करण्यास पोलिसांना यश आले होते. संशयित आरोपी सोमनाथ फुलाजी मोरे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी शनिवारी (दि.४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमनाथ याने १९ आॅगस्ट २०१३ रोजी त्याचे सासरे आत्माराम नामदेव सूर्यवंशी (५५, रा.नांदुरशिंगोटे) यांचा खून केला होता. सोमनाथ हा माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी आला होता. यावेळी सासरे यांनी पत्नीला सोबत घेऊन जाण्यास त्यास विरोध केला. यावेळी दोघांमध्ये वाद होऊन. त्यातून आत्माराम यांनी त्यांचा जावई सोमनाथ यास मारहाण केली. त्याचा राग आल्याने सोमनाथने सकाळपर्यंत तुमचा बेत बघतो, असा दम त्यांना भरला.
पोलिसांनी पुरवणी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पी. एम. पाटील यांनी युक्तिवाद केला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सोमनाथ यास जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रु पयांचा दंड ठोठावला.खून करून फरार
१९ आॅगस्टला सकाळच्या सुमारास सोमनाथ याने आत्माराम यांच्या डोक्यात दगड आणि खुरपे मारून खून केला. खून केल्यानंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्णात तब्बल पाच वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नाही; अखेर पोलिसांना त्यास अटक करण्यास यश आले.

Web Title: Born to death in a murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून