बाळासाहेब वाघ यांना ‘जीवन गौरव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:09 PM2019-01-13T22:09:10+5:302019-01-14T00:56:04+5:30

गेल्या ५० वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना नवी दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

 Balasaheb Wagh's 'Jeevan Gaurav' | बाळासाहेब वाघ यांना ‘जीवन गौरव’

बाळासाहेब वाघ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया यांच्यासह अधिकारी.

Next

नाशिक : गेल्या ५० वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना नवी दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ठाणे येथे भरलेल्या १९व्या महाराष्ट्र-गोवा राज्य विभागीय शिक्षक संमेलनात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे (ए.आय.सी.टी.ई) उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया यांच्या हस्ते बाळासाहेब वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाळासाहेब वाघ हे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून, २००३ मध्ये स्थापन झालेल्या ‘असोसिएशन आॅफ दि मॅनेजमेंट्स आॅफ अन-एडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस’ या राज्यस्तरीय नोंदणीकृत संस्थेचेही ते गत १५ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. तसेच २००५ मध्ये स्थापित असोसिएशन आॅफ दि मॅनेजमेंट्स आॅफ पॉलिटेक्निक्स’ व ‘असोसिएशन आॅफ दि मॅनेजमेंटस आॅफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर अलाइड कॉलेजेस’ या राज्यस्तरीय नोंदणीकृत असलेल्या संस्थेचे गेल्या गत १३ वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Web Title:  Balasaheb Wagh's 'Jeevan Gaurav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.