सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:26 AM2019-07-15T01:26:46+5:302019-07-15T01:27:50+5:30

राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या १०१ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस दलाला नव्याने दोन अधिकारी मिळणार असून, ग्रामीण पोलीस दलात एक उपअधीक्षक दाखल होणार आहे. शहर पोलीस दलातील एक सहायक आयुक्ताची बदली झाली आहे.

Assistant Police Commissioner's Transfer | सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

Next

नाशिक : राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या १०१ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस दलाला नव्याने दोन अधिकारी मिळणार असून, ग्रामीण पोलीस दलात एक उपअधीक्षक दाखल होणार आहे. शहर पोलीस दलातील एक सहायक आयुक्ताची बदली झाली आहे.
पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१मधील सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांची पोलीस अकादमीत उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच पुणे येथील सहायक आयुक्त समीर शेख व नवी मुंबईचे प्रदीप जाधव यांची शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली येथील विशेष कृती दलातील समरसिंग साळवे यांची नाशिक ग्रामीणच्या मनमाड उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच मालेगावच्या उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांची अहमदनगरला तर त्यांच्या रिक्त जागेवर सोलापूर ग्रामीणचे मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये शहर पोलीस दलाला दोन अधिकारी नवीन मिळाले आहेत.

Web Title: Assistant Police Commissioner's Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.