ठळक मुद्देतुपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने संशयित वकील खंदारे यांनी तुपसाखरे यांच्याकडे तीस लाख रूपयांची मागणी लोकअदालतीत सर्व वाद मिटवून सदर जमीन १ कोटी १० लाख रूपयात समझोता करून घेतला.

नाशिक : हिरावाडी परिसरातील रहिवाशाला शेतजमिनिच्या व्यवहारापोटी भ्रमणध्वनीवरून धमकावत तीस लाख रुपयांची खंडणी वसूलीप्रकरणी मनसेचा सरचिटणीस व शिवमुद्रा मित्र मंडळाचा अध्यक्ष सत्यम खंडाळे यास पंचवटी पोलिसांनी गुरूवारी (दि.१२) अटक केली. खंडाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.१५) पोलीस कोठडी सुनावली. वकीलपत्र काढून घेतल्याचा राग मनामध्ये धरून धमकावणारे अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या शेतजमिनीच्या व्यवहारापोटी खंडणी मागणाºया खंडाळे व एका वकीलावरा याबाबत हिरावाडीरोड पार्वती पॅलेस येथे राहणाºया संतोष शांताराम तुपसाखरे यांनी तक्रार दिली होती. यांनी तक्र ार दाखल केली आहे. तुपसाखरे यांच्या वडिलोपार्जित असलेल्या १८एकर जमिनीविषयी 1992 साली दिवाणी दावा दाखल केला होता. सदरचा दावा चालविण्यासाठी राजेंद्र खंदारे यांना वकिलपत्र दिलेले होते. या दाव्याचा १९९६ साली निकाल लागला. त्यावेळीच तुपसाखरे यांच्या वडिलांनी खंदारे यांना संपूर्ण रक्कम दावा चालविल्याबद्दल अदा केली. तक्र ारदार व त्यांच्या नातेवाईकांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या लोकअदालतीत सर्व वाद मिटवून सदर जमीन १ कोटी १० लाख रूपयात समझोता करून घेतला. त्यानंतर खंदारे यांच्याकडून वकीलपत्र काढून घेण्यात आले.
तुपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने संशयित वकील खंदारे यांनी तुपसाखरे यांच्याकडे तीस लाख रूपयांची मागणी करून पैसे न दिल्यास खोटया गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. पंचवटी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश बर्डेकर व पोलीस उपनिरिक्षक योगेश उबाळे यांनी संशियत खंडाळे व खंदारे यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास उबाळे करीत आहेत.