अनधिकृ त धार्मिक स्थळांबाबत आवाहन

By admin | Published: November 25, 2015 11:54 PM2015-11-25T23:54:16+5:302015-11-25T23:54:57+5:30

तहसीलदार : देवळा तालुक्यात १९ अनधिकृ त स्थळे

Appeal about unauthorized religious sites | अनधिकृ त धार्मिक स्थळांबाबत आवाहन

अनधिकृ त धार्मिक स्थळांबाबत आवाहन

Next

लोहोणेर : देवळा तालुक्यातील सार्वजनिक अथवा शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे अथवा नियमित करणे वा स्थलांतरित करण्याबाबत कारवाई करावयाची असून, याबाबत असलेल्या हरकती किंवा आक्षेप दाखल करावयाचा असल्यास त्वरित दाखल करावे, असे आवाहन देवळा तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी केले आहे.
देवळा तालुक्यातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तहसीलदार कार्यालयाने जाहीर केली आहे.
त्यानुसार महादेव मंदिर देवळा, मुंजोबा पार , पीरसाहेब दर्गा (देवळा-नाशिक रोड), नवनाथ मंदिर, दत्त मंदिर गुंजाळनगर, म्हसोबा मंदिर (निंबोळा-उमराणे रस्ता), म्हसोबा मंदिर (भावडे- देवळा- नाशिक रस्ता), म्हसोबा मंदिर (भावड बारी घाट), दत्त मंदिर, वाखारी, कांचणे दुर्गामाता मंदिर, मेशी, म्हसोबा मंदिर (मेशी ते डोंगरगाव रस्ता), कुंभार्डे खंडेराव महाराज मंदिर, म्हसोबा मंदिर (कुंभार्डे ते उमराणे रस्ता), गिरणारे धनदाई देवी मंदिर (गिरणारे ते तिसगाव रस्ता), सोमेश्वर मंदिर (तिसगाव रोड), हनुमान मंदिर (मनमाड रोड), पावजी दादा मंदिर (तिसगाव ते गिरणारे रोड), उमराणे पावजी दादा मंदिर (देवळा ते सौंदाणे रस्त्यालगत), पीरबाबा दर्गा (भावडे रस्ता) इत्यादि धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
सदरचे धार्मिक स्थळे नियमिती करणे किंवा निष्काशित करण्याबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्या दिनांक दि. २ डिसेंबर २०१५ पर्यत तालुकास्तरीय समितीकडे कळवाव्यात, असे आवाहन देवळा तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Appeal about unauthorized religious sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.