अ‍ॅँगल कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:21 AM2018-02-27T00:21:31+5:302018-02-27T00:21:31+5:30

सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागेचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असतानाच अचानक उभी बाग अ‍ॅँगल कोसळल्याने जमीनदोस्त झाल्याने निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रवीण भुसारे यांचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे.

Angle collapse due to angle | अ‍ॅँगल कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त

अ‍ॅँगल कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त

Next

सायखेडा : सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागेचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असतानाच अचानक उभी बाग
अ‍ॅँगल कोसळल्याने जमीनदोस्त झाल्याने निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रवीण भुसारे यांचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. भुसारे यांच्या गट नं. ७७७ मधील दोन एकर द्राक्षबाग लोखंडी खांब निखळल्याने जमीनदोस्त झाली. भुसे यांचा संसार उघड्यावर आला आहे.  भुसे येथील शेतकरी प्रवीण भुसारे यांची म्हाळसाकोरे शिवारात असलेली दोन एकर द्राक्षबाग आठ दिवसावर तोडणीसाठी आली होती. शनिवारी सकाळी ११ वाजता बागेच्या मंडपाचे लोखंडी खांब वजनाने उपसून बाग जमीनदोस्त झाली. बँक व सोसायटीचे कर्ज घेऊन त्यांनी बाग उभारली होती.  पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या या बागेवर लाखो रुपये खर्च करून एक्स्पोर्ट पद्धतीने बाग कमवली होती. अवघ्या आठ दिवसांवर व्यापाºयांना देण्यासाठी आलेली बाग डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याचे पाहिल्यावर शेतकºयाला रडू कोसळले. चालू हंगामात द्राक्ष उत्पादन सरासरी वाढल्याने बागेतून चांगले माल अपेक्षित होता. सध्या ३५ ते ४० रुपयांचा बाजार गृहीत धरल्यास
किमान वीस लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते. मात्र बाग पडल्याने द्राक्ष खराब झाली तसेच बागेचे कायमचे नुकसान झाल्याने शेतकºयाचा हातातोंडचा घास हिरवला गेला. शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Web Title: Angle collapse due to angle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी