कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:18 PM2019-06-14T16:18:02+5:302019-06-14T16:18:12+5:30

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात.

Angered by the ban on export of onion exports | कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे नाराजी

कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे नाराजी

Next
ठळक मुद्दे विंचूर : पिंपळगाव, लासलगाव येथील शेतकरी पुन्हा संकटात


विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात. खते, औषधांचे आण िमजुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. अवजारे किंवा खते औषधे त्यावर नव्यानेच लागू झालेला जीएसटी ने तर पार कंबरडेच मोडून गेले आहे.
केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर दहा टक्के अनुदान जाहीर केले होते. अनुदान अचानक बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे सरकारने निर्यातीवर अनुदान जाहीर केले. त्यामुळे भाव टिकून राहण्यास मदत झाली. गेल्या वर्षी अचानक कांद्याचे बाजारभाव वीस रु पये किलोपर्यंत गेले होते. पाकिस्तानमधुन पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात चोरीच्या मार्गाने कांदा आल्याने बाजारभाव घसरु न पाच रु पये किलोपर्यंत आले. परिणामी व्यापारी व शेतकर्यांचे नुकसान झाले. काही शेतकर्यांचा कांदा जागेवरच सडला, काहींनी कांदा शेतात फेकून दिला. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कांदा लावगडीत काहीशी घट झाली आहे.   कांद्याचे भाव साधारण आठ रु पये किलोपर्यंत होते. यावर्षी तरी कांद्याचे पैसे होतील. या आशेने शेतकर्यांनी कांदा साठवुन ठेवला. बाहेरील कांदा संपत आला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत गेल्यामुळे पंधरा ते वीस दिवसात कांदा १६ ते१७ रु पये किलो पर्यंत पोहचला. दररोज वाढणार्या भावामुळे   बाजारभाव वाढत असल्याचे पाहुन बराचसा साठवलेला कांदा विक्र ीसाठी काढला नाही. अचानक झालेल्या भाववाढीमुळे केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे निर्यातीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. परिणामी होणार्या भाववाढीला खीळ बसू शकते.असा अंदाज विंचूर येथील कांदा खरेदीदार योगेश कदम व्यक्त केला. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर एक मिहन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढु लागले होते. परंतु कांदा निर्यातीवरील अनुदान बंद झाल्याने कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता मावळली आहे.

Web Title: Angered by the ban on export of onion exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.