पदाधिकाऱ्यांची वाहने टोइंग केल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:22 AM2019-03-18T01:22:10+5:302019-03-18T01:23:14+5:30

युतीच्या मेळाव्यासाठी आलेल्या उत्तर महाराष्टÑातील कार्यकर्त्यांनी हॉलच्या आजूबाजूच्या परिसरात वाहनांची पार्किंग केल्याने त्यांची वाहने वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्याने मेळावा संपल्यानंतर चांगलाच वाद झाला.

The anger caused by the towing vehicles of the officials | पदाधिकाऱ्यांची वाहने टोइंग केल्याने संताप

पदाधिकाऱ्यांची वाहने टोइंग केल्याने संताप

Next
ठळक मुद्देमेळावा : कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप

नाशिक : युतीच्या मेळाव्यासाठी आलेल्या उत्तर महाराष्टÑातील कार्यकर्त्यांनी हॉलच्या आजूबाजूच्या परिसरात वाहनांची पार्किंग केल्याने त्यांची वाहने वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्याने मेळावा संपल्यानंतर चांगलाच वाद झाला.
गंगापूररोड येथे चोपडा लॉन्स येथे युतीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. मेळाव्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्टÑातून कार्यकर्ते आले होते. बहुतांश कार्यकर्त्यांनी आपली वाहने हॉलच्या संरक्षण भिंतीलगत उभ्या केल्याने अशा अनेक वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. रस्त्याला अडथळा ठरणारी वाहने टोइंग करून नेण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याने परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हॉलच्या आजूबाजूच्या परिसरात तसेच अरुंद गल्ल्यांमध्ये वाहने उभी करून कार्यकर्ते मेळाव्यासाठी गेली असता खासगी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही वाहने उभी करण्यात आल्याच्या कारणावरून अनेक चारचाकी वाहने टोर्इंग करून नेण्यात आली. सुमारे तासाभरानंतर कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर त्यांना घडल्या प्रकाराने चांगलाच मनस्ताप झाला.

Web Title: The anger caused by the towing vehicles of the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.