अन् शाळेत लागला शूटिंगचा सेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:33 AM2018-03-27T00:33:41+5:302018-03-27T00:33:41+5:30

येथील शासकीय कन्या शाळेत सोमवार (दि.२६) पासून नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून, त्यातच शाळेच्या प्रांगणात एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटही लागला आहे. त्यामुळे मुलींना शूटिंगमुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटातच परीक्षा द्यावी लागली, तर दुसरीकडे शनिवारी कोणतीही कल्पना न देता सोमवारी अचानक सुटी देऊन टाकल्याने पाचवी ते आठवीच्या मुलींचे हाल झाले.

And shooting at the school ... | अन् शाळेत लागला शूटिंगचा सेट...

अन् शाळेत लागला शूटिंगचा सेट...

Next

नाशिक : येथील शासकीय कन्या शाळेत सोमवार (दि.२६) पासून नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून, त्यातच शाळेच्या प्रांगणात एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटही लागला आहे. त्यामुळे मुलींना शूटिंगमुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटातच परीक्षा द्यावी लागली, तर दुसरीकडे शनिवारी कोणतीही कल्पना न देता सोमवारी अचानक सुटी देऊन टाकल्याने पाचवी ते आठवीच्या मुलींचे हाल झाले.  अभ्यास बुडाला तो वेगळाच, पण अचानक सुटी मिळाल्याने आणि तोपर्यंत रिक्षा, व्हॅनवाले निघून गेल्याने बस, रिक्षांची मदत घेत विद्यार्थिनींना घरी जावे लागले. अनेक विद्यार्थिनींच्या पालकांना त्यांना घेण्यासाठी शाळेत यावे लागले.  परीक्षा काळात शूटिंगचं काय मध्येच? असे विचारणाºया पालकांना ‘नाशिकमध्ये शूटिंगच होत नाही, हे होते तर होऊ द्या की’ असे अजब उत्तर देऊन गप्प करण्यात आले. शाळेच्या आवारात जागोजागी शूटिंगचे सेट लागले असून, कलाकार, तंत्रज्ञ यांची धावपळ पहायला मिळत होती. दिवसभर शूटिंग चालले. अशाप्रकारे ऐन परीक्षेच्या हंगामात शाळा शूटिंगसाठी देणे आणि विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना न देता घरी पाठवून देणे या प्रकाराबद्दल पालकांनी  आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.
एकच दिवस आणि केवळ सकाळ सत्रासाठी शाळेचा काही भाग आपण मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी दिली होती. या दरम्यान वर्गही सुरळीत सुरू असून, परीक्षाही शांततेत पार पडल्या आहेत. काही वर्ग सोडून देण्यात आले होते. पण अध्यापनात व्यत्यय येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली.  - वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: And shooting at the school ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.