गाळपेऱ्यासाठी बियाणे, खतांचे वाटप पालकमंत्र्यांची उपस्थिती : गंगावºहे येथे योजनेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:57 AM2019-01-10T01:57:11+5:302019-01-10T01:57:28+5:30

नाशिक : जलाशय व तलावाखालील जमिनीवर करण्यात येणाºया गाळपेरा क्षेत्रावरील चारालागवडीचा शुभारंभ गंगावºहे येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

Allocation of seeds and fertilizers to the crusher, Guardian Minister's presence: The scheme started at Gangavadi | गाळपेऱ्यासाठी बियाणे, खतांचे वाटप पालकमंत्र्यांची उपस्थिती : गंगावºहे येथे योजनेला प्रारंभ

गाळपेऱ्यासाठी बियाणे, खतांचे वाटप पालकमंत्र्यांची उपस्थिती : गंगावºहे येथे योजनेला प्रारंभ

Next

नाशिक : जलाशय व तलावाखालील जमिनीवर करण्यात येणाºया गाळपेरा क्षेत्रावरील चारालागवडीचा शुभारंभ गंगावºहे येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. गाळपेरा क्षेत्रावर अधिकाधिक लागवड करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे उपस्थित होते.
गंगावºहे येथे जलाशय व तलावाखालील जमिनीवर (गाळपेरा क्षेत्र) चारा पिकांची लागवड उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाला असल्याने मोकळ्या झालेल्या जमिनी चारा पिकांच्या लागवडीकरिता उपयुक्त आहेत.
पेरणीसाठी शासनाकडून शेतकºयांना बियाणे, खते मोफत दिली जातात. शेतकºयांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे यावेळी महाजन म्हणाले. पालकमंत्र्यांच्या हस्ते बाजरी व मक्याचे बियाणे शेतकºयांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी साक्षरता रथाचेही उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Allocation of seeds and fertilizers to the crusher, Guardian Minister's presence: The scheme started at Gangavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार