येवल्याच्या मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:32 AM2019-01-13T01:32:24+5:302019-01-13T01:33:23+5:30

येवला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर नसलेला विषय काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aggressive officials shout at | येवल्याच्या मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की

येवल्याच्या मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की

Next
ठळक मुद्देशिवीगाळ : दोन नगरसेवकांसह सात जणांवर गुन्हा दाखल

येवला : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर नसलेला विषय काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य अधिकारी नांदूरकर यांनी शहर पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, येवला नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दि. ११ जानेवारी रोजी ४ वाजता पालिकेच्या सभागृहात सुरू होती. दरम्यान, या सभेत नगरसेवक किरण दयानंद जावळे व दयानंद रतन जावळे यांनी अजेंड्यावर नसलेला विषय सभागृहात काढला. यावेळी मुख्याधिकारी नांदूरकर यांनी त्यांना याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र याचा राग आल्याने किरण जावळे यांनी मुख्याधिकारी यांना मारहाण करून धक्काबुक्की केली. दरम्यान, नगरसेवक दयानंद जावळे यांनी शिवीगाळ केली तसेच यावेळी नगरसेवकांचे समर्थक नीतू कंडारे, मुकेश प्रल्हाद जावळे, दीपक मोहन जावळे, भीम मनोहर जावळे, नीलेश मनोहर जावळे यांनी अनधिकृतपणे सभागृहात प्रवेश करून शिवीगाळ केली. या घटनेची चर्चा दिवसभर शहरात होती. पोलीस उपविभागीय अधिकारी आर. राजसुधा व पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
सरकारी कामात अडथळा
सरकारी कामकाजात अडथळा आणून मुख्याधिकारी नांदूरकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने नांदूरकर यांच्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक किरण दयानंद जावळे व नगरसेवक दयानंद रतन जावळे यांच्यासह नीतू कंडोरे, मुकेश प्रल्हाद जावळे, दीपक मोहन जावळे, भीम मनोहर जावळे, नीलेश मनोहर जावळे अशा एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Aggressive officials shout at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.