नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 03:04 PM2019-06-29T15:04:55+5:302019-06-29T15:09:50+5:30

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले

Abundant water in the tank, still water bow | नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

Next
ठळक मुद्देनियोजनाचा अभाव नाशिककरांना अडचणीचा20 वर्षांपासून चर खोदण्याचे काम रखडलेचेहेडी बंधाऱ्याचा प्रश्न कायम

संजय पाठक, नाशिक : अखेर नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला असून उद्या पासून चार विभागात एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे तर दर गुरुवारी कोरडा दिन पाळला जाणार आहे. नाशिक शहरासाठी पाण्याची कमी नाही तब्बल पाच धरणातून पाणी उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर आताही धरणात सुमारे तीनशे दश लक्ष घन फूट पाणी साठाही शिल्लक आहे परंतु तरीही नाशिककरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले. गंगापूर धरणाची क्षमता कमी होऊन ती 5600 दश लक्ष घन फूट इतकी झाली असली तरी कश्यपी आणि गौतमी गोदावरी या धरणातून अतिरीक्त 3600 दश लक्ष घन फूट पाणी उपलब्ध झाले मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेने 1999 मध्ये गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण केली. त्यावेळी धरणाच्या हेड वर्क म्हणजे शिरो भागाचे काम करताना जलविहिरीच्या पुढे धरणातील निच्चांकी पातळीचे पाणी घेण्यासाठी चर खोदण्याचे एक काम अंतर्भुत होते तेच केले गेले नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे काम होऊ शकले नाही त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा महापालिकेच्या जलविहिरीत पाणी येत नाही आणि अडचण होते आज कश्यपी धरणात 90 आणि गौतमी धरणात 60 दश लक्ष घन फूट पाणी गंगापूर धरणातील साठ्या शिवाय शिल्लक आहे पण ते धरणात आले तरी चर नसल्याने हे पाणी मनपाच्या जल विहिरीत येऊ शकत नाही.
असाच प्रकार चेहेडी बंधाऱ्याच्या बाबतीत आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड विभागातील बहुतांशी भागात दारणा धरणातील पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी चेहेडी बंधाऱ्यातून उचलले जाते. पण बंधाऱ्याच्या अलिकडे भगूर आणि देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे मलजल सोडले जाते त्यामुळे येथून उचलले पाणी अत्यंत दूषित असल्याने मे आणि जून महिन्यात किमान 20  ते 25 दिवस येथून पाणी उचलता येत नाही. आज दारणा धरणात महापालिकेच्या हक्काचे 150 दश लक्ष घन फूट पाणी असूनही देखील ते मिळणे दुरापास्त आहे. ही समस्याही जुनीच आहे पण मलजल येते त्याच्या पलीकडे नवीन बंधारा बांधणे किंवा तेथे पाईपलाईन टाकून थेट शुद्धीकरण केंद्रा पर्यंत पाणी आणणे महापालिकेला आजवर शक्य झालेले नाही याच समस्यांमुळे आज नाशिककरांना धरणात पाणी असूनही कपातीला सामोरे जावे लागत आहे

Web Title: Abundant water in the tank, still water bow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.