शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना ८६ लाखांचा गंडा; टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:38 AM2017-12-02T01:38:07+5:302017-12-02T01:39:33+5:30

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व त्यांच्या पालकांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखोे रुपये उकळणाºया एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

86 lakhs of unemployed youth by showing bait for government jobs; Attend the gang | शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना ८६ लाखांचा गंडा; टोळी अटकेत

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना ८६ लाखांचा गंडा; टोळी अटकेत

Next
ठळक मुद्देपाच जणांच्या टोळीला या प्रकरणी पकडण्यात आले संशयितांना पोलीस कोठडी मालेगाव येथेही बेरोजगार युवकांची फसवणूक

नाशिक : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व त्यांच्या पालकांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखोे रुपये उकळणाºया एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या टोळीला या प्रकरणी पकडण्यात आले असून, २ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकला दिलीप नागू पाटील सटाणा परिसरात राहतात. त्यांचा तरुण मुलगा मयूर दिलीप पाटील याला पाटबंधारे खात्यात नोकरीचे आमिष या टोळीने दाखविले होते. या नोकरीच्या आमिषाने दिलीप पाटील यांच्याकडून मुख्य संशयित दिनेश लहारे याने १७ लाख रुपये उकळले होते.
यासाठी त्याने विनय अनंत दळवी (५२), शंकर बाबूराव कोळसे-पाटील (४२), रमेश बाजीराव देवरे (५२), प्रवीण वालजी गुप्ता या चौघांसोबत एक टोळी तयार केली होती. दिलीप पाटील यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी धोबीआळी (ठाणे) येथून दिनेश लहारे यास अटक केल्यानंतर या टोळीचा उलगडा झाला. या टोळीने ठाणे, मुंबईसह राज्यभरातील ३३ तरुणांना रेल्वेत, पोलिसांत, पाटबंधारे विभागात, सार्वजनिक बांधकाम विभागासह सरकारी कार्यालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने तब्बल ८६ लाख रुपये उकळल्याचा उलगडा दिनेश लहारे यास ठाणे येथे अटक केल्यानंतर झाला. दिनेश लहारे यास न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त परमारसिंग, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे सखोल तपास करीत आहेत. यातील रमेश देवरे हा संशयित नाशिकच्या अमृतधाम येथील रहिवासी असून, दिलीप पाटील यांच्या फसवणुकीसाठी ते मुख्यत: कारणीभूत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
मालेगावची पुनरावृत्ती
मालेगाव येथेही अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता ठाण्याच्या टोळीला अटक झाल्यानंतर त्याची पुनरावृत्ती झाली आहे. सरकारी नोकरी, सरकारी अधिकाºयांचे सही-शिक्के, बनावट नियुक्तीपत्रे हा सारा प्रकार दोन्ही बाबतीत सारखा असल्याने मालेगाव फसवणुकीची ही पुनरावृत्ती असल्याची चर्चा आहे. कळवा येथील हरिदास पानसरे यांच्या मुलाला नाशिकच्या पोलीस अकादमीत विना परीक्षा उपनिरीक्षक झाल्याचे खोटे बनावट पत्र या टोळीने नऊ लाख रुपये घेऊन दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Web Title: 86 lakhs of unemployed youth by showing bait for government jobs; Attend the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस