जुगार अड्डे चालविणारे २३ संशयित तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:17 PM2018-01-21T23:17:48+5:302018-01-22T00:25:03+5:30

शहर पोलिसांनी जुगार धंद्यांवर वेळोवेळी छापे टाकून कारवाई केलेले जुगार धंदे चालविणारे टोळीप्रमुख व या टोळीतील सदस्यांसह सुमारे २३ जुगाºयांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ यामध्ये खडकाळीतील रमाबाई आंबेडकरनगरमधील समीर विजय यादव याचाही समावेश आहे़ विशेष म्हणजे शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे़

 23 suspected conspirators running the gambling runway | जुगार अड्डे चालविणारे २३ संशयित तडीपार

जुगार अड्डे चालविणारे २३ संशयित तडीपार

Next

नाशिक : शहर पोलिसांनी जुगार धंद्यांवर वेळोवेळी छापे टाकून कारवाई केलेले जुगार धंदे चालविणारे टोळीप्रमुख व या टोळीतील सदस्यांसह सुमारे २३ जुगाºयांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ यामध्ये खडकाळीतील रमाबाई आंबेडकरनगरमधील समीर विजय यादव याचाही समावेश आहे़ विशेष म्हणजे शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे़  शहरातील गुन्हेगारीस पोषक ठरणाºया जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते़ या अड्ड्यांपासूनच गुन्हेगारीची सुरुवात होत असल्याने हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जुगार अड्डे चालक व जुगार खेळणाºयांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी थेट तडीपारीची कारवाई सुरू केली आहे़ २०१६-१७ मध्ये वरळी, मेन, जनता, अंदर-बाहर या प्रकारच्या जुगाराचे सात गुन्हे दाखल असलेल्या टोळीविरोधात ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये समीर यादव व त्याच्या टोळीतील २२ जणांचा समावेश आहे़ या २३ जुगाºयांना शहरासह जिल्ह्यातून १५ जानेवारीपासून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.  पोलिसांनी तडीपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख समीर यादव, बल्ली गौतम, हसन शेख, सुरेश पवार, फारूख शेख गुलाब, सचिन मोरे, रवि चव्हाण, शेख रहेमान, मुक्तार शेख, कमलाकर दोंदे, तुषार गायकवाड, ईस्माईल खान, मेहमूद शहा, विनोद राऊत, रफिक पठाण, अल्ताफ शेख, मोहिन शेख, महंमद हुसेन, अकबर शेख, आकाश परदेशी, साजीद पटेल, कैसरअली सय्यद, दत्तू बेंडकुळे यांचा समावेश आहे़

Web Title:  23 suspected conspirators running the gambling runway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.