महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन

By Suyog.joshi | Published: February 7, 2024 04:11 PM2024-02-07T16:11:40+5:302024-02-07T16:12:06+5:30

मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे. 

20 charging stations by the Municipal Corporation in the first phase | महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन

महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन

नाशिक (सुयोग जोशी) : केंद्र सरकारच्या 'एन कॅप' योजनेअंतर्गत (राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम) शहरात पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे. 

केंद्र व राज्य शासन प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. अशा वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात आहे. नाशिक शहरातही इलेक्ट्रिक वाहनास पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता महापालिका 'एन कॅप' योजनेअंतर्गत शहरात पुढील काही वर्षांत १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार असून, पहिल्या टप्प्यात वीस स्टेशन उभारली जाणार आहेत. त्यासाठी मागील वर्षभरात मनपा विद्युत विभागाने तीनदा फेरनिविदा राबविल्या. 

त्यात टाटा, रिलायन्स यासारख्या दिग्गज कंपन्यांनी प्रतिसाद दिला; पण कागदपत्र पूर्तता व तांत्रिक तपासणीत निविदा अपात्र ठरल्या. तिसऱ्या फेरनिविदेत सहा कंपन्यांनी सहभाग दर्शवला. त्यानंतर तांत्रिक तपासणीत दिल्ली येथील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीचे देशातील अनेक शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले आहे. आणखी काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर या कंपनीला हे काम दिले जाणार असून, लवकरच चार्जिग स्टेशन उभारण्यास सुरुवात होईल. त्यासाठी मनपा जागा उपलब्ध करून देणार आहे.

येथे होणार स्टेशन...
राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान.

Web Title: 20 charging stations by the Municipal Corporation in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक