दिंडोरीत १५० जणांना विषबाधाचर्चासत्र भोवले : एका शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक, पिंपळगावी उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:08 AM2017-11-09T00:08:35+5:302017-11-09T00:12:19+5:30

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र कार्यक्रमानंतर दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने एका शेतकºयाचा मृत्यू, तर सुमारे १५०हून अधिक शेतकºयांना बाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. बाधीत शेतकºयांवर नाशिक व दिंडोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

150 people killed in Dindori case: The unfortunate death of a farmer; Continuing the treatment of Nashik, Pimpalgaon | दिंडोरीत १५० जणांना विषबाधाचर्चासत्र भोवले : एका शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक, पिंपळगावी उपचार सुरू

दिंडोरीत १५० जणांना विषबाधाचर्चासत्र भोवले : एका शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक, पिंपळगावी उपचार सुरू

Next
ठळक मुद्देउमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र अतुल केदार (४१) यांचे उपचारादरम्यान निधन

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बु।। येथे धात्रक वस्तीवर एका बियाणे कंपनीने टमाटा उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेल्या चर्चासत्र कार्यक्रमानंतर दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने एका शेतकºयाचा मृत्यू, तर सुमारे १५०हून अधिक शेतकºयांना बाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. बाधीत शेतकºयांवर नाशिक व दिंडोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पेठरोडवरील उमराळे बुद्रुक येथे रमेश मनोहर धात्रक यांच्या वस्तीवर बायर सीड कंपनीने बुधवारी संकरित टमाटा पीकपहाणी व चर्चासत्र आयोजित केले होते. सदर चर्चासत्र दुपारी १ वाजता संपल्यानंतर उपस्थित सुमारे १५० शेतकºयांनी येथे जेवण केले. काही वेळाने त्यातील काही शेतकºयांना मळमळ, उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील अतुल केदार (४१) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार धनराज महाले, प्रांत उदय किसवे, तहसीलदार गाढवे, कैलास मवाळ, माधवराव साळुंखे यांनी रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयात प्रमोद अपसुंदे, रामचंद्र मेधने, रामू अपसुंदे, शांताराम अपसुंदे, राजेंद्र केदार, स्वप्नील केदार, राजेंद्र थेटे, नीलेश नागरे, उत्तम केदार, अंकुश केदार, मंगेश कदम, बबलू गवारे आदींवर उपचार सुरू आहे. चौघे जिल्हा रुग्णालयात विषबाधा झालेल्या चार रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या रुग्णांमध्ये छबाबाई धोंडीराम कडाळी (३४), किसन सुखा कडाळी (६०), बाळू लक्ष्मण जाधव (५५) व मनीषा सुनील कडाळी (३२, सर्व रा़ उमराणे, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) यांचा समावेश आहे़ उर्वरित रुग्णांना शहरातील अपोलो हॉस्पिटल, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहेग़ुरुवारी रात्री नाशिक जिल्हा रु ग्णालयात ४० तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात १२ शेतकºयांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिंडोरी व नाशिक येथील रुग्णालयात ५० हून अधिक रु ग्ण दाखल आहे.

 

Web Title: 150 people killed in Dindori case: The unfortunate death of a farmer; Continuing the treatment of Nashik, Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.