त-हाडी येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:58 PM2018-02-26T12:58:04+5:302018-02-26T12:58:04+5:30

Women have been spoiled by alcohol in T-bone | त-हाडी येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूसाठा

त-हाडी येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूसाठा

Next


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील त:हाडीतर्फे बोरद या गावात मागील ब:याच वर्षापासून अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे. याला कंटाळून येथील श्रमिक महिलांनी आक्रमक प्रवित्रा घेत प्रथम पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. परंतु पोलीस प्रशासनाकडून निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने सरपंच, महिला बचत गट व श्रमिक महिलांनी विक्रेत्यांकडील दारूसाठा उद्ध्वस्त केला.
त:हाडी त.बो. येथे दारूबंदी व्हावी म्हणून महिलांनी 20 फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र पोलिसांकडून काहीही दखल घेण्यात न आल्याने किंवा कुठल्याही प्रकारची विचारपूस न झाल्याने नाईलाजास्तव येथील महिला बचत गट, ग्रामपंचायत सरपंच, श्रमीक महिलांनी एकत्र येऊन 20 व 21 फेब्रुवारी रोजी दारु विक्रेत्यांकडील दारूचा साठा उद्ध्वस्त केला. परंतु काही दारू विक्रेते महिलांना जुमानत नसल्याने याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. दारु विक्रेते सदर महिलांना दमदाटी करतात. त्यामुळे दारुबंदी विभाग (राज्य उत्पादन शुल्क विभाग) व जिल्हा पोलीस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल देण्याची गरज आहे.
वास्तविक पाहता त:हाडी परिसरातील परिवर्धे, कलसाडी, सोनवल, काथर्दा, वाघोदा, कोठली या गावात दारुबंदी असल्याने दारुचा एक थेंबही विकला जात नाही. परंतु त:हाडी गावात अवैध दारुची भरमसाठ सर्रास विक्री होत आहे. अवैध दारु विक्रीमुळे येथील श्रमिक महिलांना संसार व घर चालविणे कठीण झाले आहे. दारु पिऊन पुरुष घरी आल्यानंतर महिलांना मारझोड करतात. त्यामुळे घरात कौटुंबीक कलह निर्माण होतो. दारुबंदीसाठी जर श्रमिक महिला एकत्र येऊन दारु विक्रेत्यांच्या दारु अड्डय़ांवर धाड टाकून दारूचा साठा नष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढा देत असतील तर प्रशासनाच्या दृष्टीने ही फारच खेदाची बाब आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष गावात येऊन अवैध दारु विक्रेत्यास समज देऊन या गावातील दारु विक्री कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी सरपंच छायाबाई गोवर्धन ठाकरे, प्रियंका नगीन पाटील, भाग्यश्री गौतम पानपाटील, मंगला संजय सुतार, सुनंदा संतोष पारधी, लताबाई हरीश खोडे, रत्नाबाई शंकर पवार, पिंटी बाई कैलास पाडवी, संगीता लोहा:या पावरा, प्रियंका किरमा वळवी आदी महिलांनी केली आहे.

Web Title: Women have been spoiled by alcohol in T-bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.