वाहतूक पोलिसांकडून नंदुरबारात ई-चलन प्रणाली कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:40 PM2019-05-25T12:40:29+5:302019-05-25T12:40:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाईसाठी शुक्रवार 24 पासून ई-चलान प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. ...

Traffic Police implement e-currency system in Nandurbar | वाहतूक पोलिसांकडून नंदुरबारात ई-चलन प्रणाली कार्यान्वीत

वाहतूक पोलिसांकडून नंदुरबारात ई-चलन प्रणाली कार्यान्वीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाईसाठी शुक्रवार 24 पासून ई-चलान प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या उपकरणांचे वाटप पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते कर्मचा:यांना करण्यात आले. वाहनचालकांकडून ऑनलाईन दंड आकारणे व वाहनधारकांना कारवाईबाबत एसएमएस द्वारे सुचीत करण्यात येणार आहे. 
शहरातील वाहतुकीची समस्या मोठी आहे. वाहतूक कर्मचा:यांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. उन, वारा, पाऊस अशा वातावरणात काम करतांना दंडाची पावती फाडावी लागते. अशा वेळी वाहनचालकांकडून वादही घातले जात असतात. त्यामुळे कारवाईत अडथळा येतो. ही बाब लक्षात घेता मोठय़ा शहरांमध्ये ई-चलान प्रणालीचा वापर केला जातो. त्याचाच वापर आता नंदुरबारातही करण्यात येणार आहे. नंदुरबारात ही प्रणाली यशस्वी झाल्यास शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
या प्रणाली अंतर्गत वाहनधारकाने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना ई-चलान उपकरणाद्वारे ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्यात येणार आहे. याद्वारे एटीएम किंवा डेबीट कार्डद्वारे दंडाची रक्कम किंवा पेमेंट भरता येणार आहे. वाहनधारकांना त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत एसएमएसची सुविधा उपलब्ध होणार आहे. तत्पर कारवाईचे फोटो घेण्याची सुविधाही राहणार आहे. नागरिकांसाठी महाट्रॅफिक अॅपची सुविधा देखील राहील. 
या उपकरणांचे वितरण वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचा:यांना 24 रोजी करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयात संजय पाटील यांनी त्यांचे वितरण केले. यावेळी त्यांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या कामाला गती देण्याचे आवाहन कर्मचा:यांना केले. वाहतुकीचे नियोजन सुव्यवस्थित करून कारवाई करतांना सौजन्याने वागावे अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस निरिक्षक भोये, राहुल शेजवळ उपस्थित होते.

Web Title: Traffic Police implement e-currency system in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.