चोरीच्या आठ दुचाकीसह तीन जण एलसीबीच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:41 PM2019-05-25T12:41:49+5:302019-05-25T12:41:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोटरसायकल चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल घेणारे अशा तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या ...

Three people with eight bikes stolen from LCB | चोरीच्या आठ दुचाकीसह तीन जण एलसीबीच्या ताब्यात

चोरीच्या आठ दुचाकीसह तीन जण एलसीबीच्या ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोटरसायकल चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल घेणारे अशा तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीस कर्मचा:यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
तुषार शालीग्राम कोळी रा.म्हळसरे, ता.शिंदखेडा, सागर उर्फ भाईजी संतोष सावळे, जितेंद्र कैलास पाटील, रा.मोरतलाई, ता.पानसेमल असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेकडून तपास सुरू होता. अशातच एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी खेडदिगर, ता.शहादा येथे पाळत ठेवली असता खेडदिगर बस स्थानक आवारात एकजण मोटरसायकलवर संशयीतरित्या फिरतांना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. नंतर त्याने चोरीची मोटरसायकल असल्याचे सांगितले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने नरडाना, शिरपूर, धुळे तसेच सुरत येथून सहा मोटरसायकली चोरी करून मध्य प्रदेशात बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यात विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पानसेमल तालुक्यातील मोरतलाई गावातील सागर उर्फ भाईजी संतोष सावळे याच्या ताब्यातून चार महागडय़ा दुचाकी जप्त केल्या. जितेंद्र कैलास पाटील याच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच  तुषार शालीग्राम कोळी याने 15 मे रोजी चोरी केलेली दुचाकी पेट्रोल संपल्याने फेकून दिली होती. ती उपनगर पोलिसात जमा करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने एकुण दोन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी ताब्यात घेतल्या. शिवाय तुषार कोळी, सागर सावळे, जितेंद्र पाटील यांना अटक केली. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार जगदीश पवार, प्रदीप राजपूत, विनोद जाधव, विकास अजगे, राहुल भामरे, किरण मोरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.


 

Web Title: Three people with eight bikes stolen from LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.