‘ऑटो वेदर स्टेशन’व्दारे नंदुरबार व नवापूरची तापमानाची मोजनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:13 PM2018-03-22T13:13:22+5:302018-03-22T13:13:22+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय : कुलाबा येथील तंत्रज्ञांनाचा झाला पाहणी दौरा

The temperature of Nandurbar and Navapur is estimated by Auto Weather Station | ‘ऑटो वेदर स्टेशन’व्दारे नंदुरबार व नवापूरची तापमानाची मोजनी

‘ऑटो वेदर स्टेशन’व्दारे नंदुरबार व नवापूरची तापमानाची मोजनी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याचे तापमान मोजनी  करण्यासाठी मुंबई येथील कुलाबा हवामान खात्याकडून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ऑटो वेदर स्टेशन’ बसविण्यात आले आह़े गेल्या काही दिवसांपासून कुलाबा येथील तंत्रज्ञ कर्मचा:यांची टीम नंदुरबारात आली होती़ त्यावेळी या स्टेशनची उभारणी करण्यात आली़
जिल्ह्यात नंदुरबार व नवापूर या दोन ठिकाणी ‘ऑटो वेदर स्टेशन’ बसविण्यात आले आह़े यामुळे दर अर्धा तासानंतर तापमानाची नोंद  बघणे सोयी ठरणार आह़े या स्टेशनअंतर्गत सर्व रिडींग सेन्सरव्दारे घेतले जाणार आह़े त्यात, हवेचा वेग, हवेची दिशा, हवेचा दाब, तापमान, आद्रता, पावसाची स्थिती, दिवसभरातील सूर्य किरणांची स्थिती, समुद्र सपाटीपासूनचा दाब आदींची नोंद या ‘वेदर स्टेशन’व्दारे करण्यात येणार आह़े 
दरम्यान, मंगळवारी या ‘ऑटो वेदर स्टेशनचे’ उद्घाटन करण्यात आले असून कुलाबा येथील हवामान खात्याकडून याचा सर्व देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े
नंदुरबारसोबतच नवापूर येथेही स्टेशन उभारण्यात आले आह़े नंदुरबार शहरात सुरुवातीला तहसील कार्यालयात हे स्टेशन सुरु करण्यात आले होत़े परंतु त्या ठिकाणी ते बंद झाल्यानंतर तापमानाचे मोजमाप करण्यासाठी पुरेशी कुशल यंत्रणा नसल्याने अनंत अडचणी येत होत्या़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलाबा येथील हवामान खात्यात जिल्ह्याच्या तापमानाची नोंद होण्यास अनेक अडचणी निर्माण होत होत्या़ त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकामधूनही चुकीच्या तापमानाची बातमी प्रसिध्द करण्यात आली होती़ आता ‘ऑटो वेदर स्टेशन’मुळे मनुष्यविरहित पध्दतीने तापमानाची नोंद होणार आह़े त्यामुळे दररोज योग्य तापमानाची नोंद केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारसह धुळे जिल्ह्याबाबतही अशा अडचणी येत असल्याचे कुलाबा हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े खान्देशातील जळगाव वगळता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तापमानाचे व्यवस्थीत रिडींग येत नसल्याचेही सांगण्यात आले होत़े 

Web Title: The temperature of Nandurbar and Navapur is estimated by Auto Weather Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.