सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:05 PM2019-02-11T18:05:43+5:302019-02-11T18:05:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंचतर्फे चौथा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी ...

Shubhamangal of 17 couples at the group wedding | सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल

सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादा : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंचतर्फे चौथा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी लहान शहादा येथे उत्साहात झाला. या सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. या सोहळ्यात तीन राज्यातील सुमारे 20 हजार समाज बांधवांनी  उपस्थिती लावली होती.
नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयापासून सजविण्यात आलेल्या वाहनातून वरांची सकाळी नऊ वाजता मिरवणूक काढण्यात आली. 10 वाजता सर्व वर विवाहस्थळी दाखल झाले. या ठिकाणी 17 जोडप्यांचा ब्राम्हवृदांच्या मंगलाष्टकांनी व शहनाईच्या मंद सुरात उत्साहात शुभमंगल सोहळा झाला. याप्रसंगी खासदार डॉ.हिना गावीत, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार के.सी पाडवी, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी रोहयो व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मोबाईलचा माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला.
सोहळ्यास अखिल भारतीय लेवा पाटीदार समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा कमलताई पुरुषोत्तम पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नंदुरबारचे नगराध्यक्ष परवेज खान, देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, साने गुरुजी विद्यालय प्रसारक संस्थेचे समन्वयक मकरंद पाटील, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती सुनील पाटील, जिज्ञासा दीदी, जिल्हा परिषदेचे माजी  उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, नगरसेविका ज्योती पाटील, सुनील पटेल,            महेंद्र पाटील, जगदीश पाटील, अॅड.प्रभाकर पाटील, रघुनाथ पाटील, महेंद्र पाटील, मुरार पाटील, दशरथ पाटील, माधवी पटेल, प्रीती पाटील, वसंत पाटील, संजय पाटील, डॉ.सविता पाटील, गिरीश     महाराज, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, गुजर समाज मंच व विविध शहरे ग्राम गुजर मित्र मंडळाच्या वतीने तयारी करण्यात येत होती. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून 20 हजारांवर व:हाडी या सोहळ्याचे साक्षीदार झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोहळा पार पडला. या वेळी समशेरपूर येथील राकेश पाटील व निझर येथील मुकेश पाटील या नवरदेवांनी पाणी वाटप करून श्रमदान केले.
समाजातील युवकांकडून या कार्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. या विवाह सोहळ्याकरीता विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात स्वागत समिती, भोजन समिती, मंडप समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक समिती, ध्वनिक्षेपक समिती, वधू-वर मिरवणूक समिती, सजावट समिती, अकस्मात समिती आदी विविध समित्यांच्या समावेश करण्यात आला होता. या समित्यांच्या माध्यमातून समाजातील 150 युवक- युवतींनी यात हिरीरीने सहभाग घेतला.

Web Title: Shubhamangal of 17 couples at the group wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.