‘हरित सातपुडा’ करण्याचा कुंडी ग्रामस्थांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:12 PM2018-07-22T13:12:34+5:302018-07-22T13:12:41+5:30

ग्रामस्थांतर्फे फळझाडे लागवड : जिल्हाधिका:यांच्या हस्ते शुभारंभ

Resolutions of the villagers 'Harit Satpuda' | ‘हरित सातपुडा’ करण्याचा कुंडी ग्रामस्थांचा संकल्प

‘हरित सातपुडा’ करण्याचा कुंडी ग्रामस्थांचा संकल्प

Next

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी येथे सामुदायिक वनहक्क जमिनीवर गवकारिणी शनिवारी पाच हजार फळ लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आल़े
वनव्यवस्थापन समिती व लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुंडी गावातील सामुदायिक वनहक्क जमिनीवर श्रमदानातून 5 हजार फळझाड लागवड करण्यात आल़े लोकसमन्वय प्रतिष्ठान, स्थानिक वनव्यवस्थापन समिती  यांनी  ‘हरित सातपुडा’ ह्या प्रकल्पांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी या दुर्गम गावात योजनेचा शुभारंभ केला 
कुंडी हे अक्कलकुवा तालुक्यातील पेसा गाव असून वनहक्क कायद्याअंतर्गत ह्या गावाला 198 हेक्टर सामुदायिक वन क्षेत्र प्राप्त झाले आह़े गावातील लोकांनी लोक समन्वय प्रतिष्ठान सोबत या क्षेत्रावर झाडे व फळझाडे लावण्याचे निश्चित केले आह़े ग्रामस्थांनी श्रमदानातून  गावात मे महिन्यात प्रत्येक स्त्री व पुरुषाने 60 खड्डे, असे एकूण 5 हजार 12 खड्डे श्रमदानातू खोदले आहेत़  यात महू, आंबा, चिंच, आवळा, बांबू, साग, जांभूळ आदी फळ झाडांची रोप लागवड करणार आली आहेत़ या कामासाठी वनविभागाचेही सहकार्य मिळत आह़ेजिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी वनसंवर्धन व वनरोपन या महत्वाच्या कार्यात सहभाग घेतल्याबाबत कुंडी ग्रामस्थांचे कौतुक केल़े लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी कुंडी गावातील ऐकता व श्रमदानातून हरित सातपुडय़ाच्या चळवळीला बळ मिळाल्याचे प्रतिपादन केल़े तसेच कुंडी हे पर्यटन स्थळ होऊन त्यातून रोजगार निर्मितीचा प्रकल्प आदिवासी विकास विभागाने उभ करावे असे आव्हान केल़े अक्कलकुवा तालुक्यातील तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार विजय बनसोड, अक्कलकुवा पीएसआय राऊत तसेच वन विभागाचे उपवनसंरक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े तसेच कुंडी गावाचे प्रभाकर वसावे, दोहरी वसावे, संजय महाजन, विद्या वाघ आदी उपस्थित होत़े
 

Web Title: Resolutions of the villagers 'Harit Satpuda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.