गावीत बंधूंच्या भेटीने राजकीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:32 AM2019-03-19T11:32:08+5:302019-03-19T11:32:27+5:30

नंदुरबार : भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत व त्यांचे बंधू राष्टÑवादीचे माजी आमदार शरद गावीत यांची त्यांच्या निवासस्थानी ...

 Political talk with members of the Gavit brothers | गावीत बंधूंच्या भेटीने राजकीय चर्चा

गावीत बंधूंच्या भेटीने राजकीय चर्चा

Next

नंदुरबार : भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत व त्यांचे बंधू राष्टÑवादीचे माजी आमदार शरद गावीत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्याने यासंदर्भात राजकारणात विविध चर्चांना ऊत आला आहे.
लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू असताना सोमवारी अचानक डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत हे त्यांच्या निवासस्थानी आले. या दोन्ही बंधूत पाच मिनीटे चर्चाही झाली. या चर्चेमुळे राजकीय गोटात विविध चर्चांना ऊत आला आहे. डॉ.गावीत व शरद गावीत यांच्यात एरवी भेट होत असते. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस यांची राज्यात आघाडी असून जिल्ह्यातही आघाडी धर्म पाळणार असल्याचे यापूर्वीच राष्टÑवादीने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीने चर्चेला महत्त्व आले आहे.

Web Title:  Political talk with members of the Gavit brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.