दूषित पाण्याचा एक घोट अन गाव सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:43 PM2018-10-17T12:43:36+5:302018-10-17T12:43:41+5:30

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  1 हजार 120 कुटूंबे राहणा:या सहा हजार लोकवस्तीच्या कहाटूळ गावातील प्रत्येक ...

One drop of contaminated water on the village saline | दूषित पाण्याचा एक घोट अन गाव सलाईनवर

दूषित पाण्याचा एक घोट अन गाव सलाईनवर

googlenewsNext

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  1 हजार 120 कुटूंबे राहणा:या सहा हजार लोकवस्तीच्या कहाटूळ गावातील प्रत्येक घरात डायारियाची लागण झालेला किमान एक रूग्ण असल्याचे समोर येत आह़े  पाणीपुरवठय़ाच्या जीर्ण पाईपातून पिवळ्याशार पाण्याचा घोट घेतल्यापासून गाव सलाईनवर असून यासाठी आता प्रशासन धावपळ करत असले तरी ही साथ पसरण्यासाठी कारणीभूत असलेली पाणीटंचाई मात्र अद्यापही कायम आह़े
शहादा शहरापासून पूव्रेला 10 ते 12 किलोमीटर अंतरावरचे कहाटूळ गाव दोन दिवसांपासून डायरियाच्या अचानक उद्भवलेल्या साथीशी झगडत आहेत़ यात 10 वर्षीय बालक  बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने उपाययोजनांची ठिगळं लावून हा प्रकार निस्तरण्याचा प्रयत्न केला असला तरीही साथरोग पूर्णपणे आटोक्यात आलेला नसल्याचे आरोग्य केंद्रातील स्थितीवरुन स्पष्ट होत आह़े आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल केल्यानंतर साधा वीज पुरवठाही नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाल़े दरम्यान येथून मंगळवारी बानूबाई पावरा (63), रूख्माबाई कोळी (73) आणि चार वर्षीय विशाल पाडवी या बालकास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़  गावात दारिद्रय़रेषेखालील 404 कुटूंबे आहेत त्यातील किमान 100 कुटूंबे साथरोगाने बाधित आहेत़ यामुळे गोरगरीबांच्या वसाहतीत शुकशुकाट आह़े अनेकांकडे दोन दिवसात चूलच पेटली नसल्याचे सांगण्यात आल़े संसदरत्न खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दत्तक घेतलेल्या या गावात भेट दिली असता, येथील भिषण पाणीटंचाईच डायरियाच्या साथीचे प्रमुख कारण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल़े तापीकाठापासून 10 किलोमीटर अंतरावरील कहाटूळ गावात पाणीपुरवठय़ासाठी 70 वर्षापूर्वी पायविहिरीची निर्मिती करण्यात आली होती़ याच विहिरीचे वेळावेळी पुनरुज्जीवन करून गावाला पाणी पुरवठा सुरु होता़ परंतू ही योजना कोरडी झाल्यानंतर ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वी भोंगरा शिवारातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे आणून ते पायविहिरीत सोडले होत़े येथून पुन्हा पाईपलाईनद्वारे हे पाणी घराघरात पोहोचले होत़े हा पाणी पुरवठा करण्यासाठी 1984 पासूनची मुख्य पाईपलाईन वापरात आणली गेली़ वर्षानूवर्षे जीर्ण झालेल्या या पाईपलाईनवर गटारी बांधल्याने त्यातील पाणी पाईपांमध्ये जाऊन गावाला दूषित पाणी पुरवठा सुरु होता़ वर्षभरापासून सुरु असलेल्या दूषित पाणीपुरवठय़ाचा परिणाम डायरियाच्या रुपानेसमोर आला आह़े साथ पसरल्यानंतर जुलाब आणि उलटय़ांनी बेजार झालेल्या 56 रूग्णांना रविवारी रात्रीपासून आरोग्य केंद्रात दाखल केले गेले होत़े शनिवारी गावात नळाद्वारे सोडलेले पिवळेशार पाणी प्यायल्याने करण भिल या 11 वर्षीय बालकाचा केवळ सात तासात करूण अंत झाल्यानंतर या घटनेचे गांभिर्य समजून घेत अधिका:यांनी येथे धाव घेतली़ तूूर्तास याठिकाणी सहा वैद्यकीय अधिका:यांचे पथक तैनात आह़े मंगळवारी 21 जणांची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आह़े तर उर्वरित 35 रूग्णांवर येथेच उपचार सुरु आहेत़ वीज नसलेल्या आरोग्य केंद्रात सोय होत नसल्याने नागरिकांनीच घरुन आणलेल्या खाटांवर रूग्णाला टाकून देत आवारातील झाडाला बांधलेल्या सलाईन लावून साथरोग दूर सारण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आह़े 
 

Web Title: One drop of contaminated water on the village saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.