विद्यापीठाच्या ‘सिलेज’ प्रकल्पाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:11 AM2019-07-19T11:11:44+5:302019-07-19T11:11:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू होणा:या आदिवासी अकादमीअंतर्गत शहर आणि खेडे यांच्या ...

Launch of the University's 'Silage' project | विद्यापीठाच्या ‘सिलेज’ प्रकल्पाचा शुभारंभ

विद्यापीठाच्या ‘सिलेज’ प्रकल्पाचा शुभारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू होणा:या आदिवासी अकादमीअंतर्गत शहर आणि खेडे यांच्या सुविधांचे एकत्रिकरणाच्या अर्थात सिलेज प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाल्याची माहिती कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी नंदुरबारात दिली. या प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने 13 कोटी 95 लाख 91 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे.  
या प्रकल्पाच्या कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते येथील पी.के.अण्णा पाटील विद्यालयाच्या आवारात झाला. त्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.पाटील बोलत होते. यावेळी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर, प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ.एस.टी.बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक डॉ.ए.बी.चौधरी,  विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.दिलीप पाटील, काकासाहेब हिरालाल चौधरी शिक्षण संस्थेचे डॉ.रवींद्र चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, सिनेट सदस्य प्रा.डॉ. दिनेश खरात, जी.वाय.पाटील उपस्थित होते.  
कुलगुरू डॉ.पाटील यांनी सांगितले, नंदुरबारात आधीच आदिवासी अकादमी मंजुर झाली आहे. यासाठी राज्य शासनाकडून 25 एकर जागा देखील उपलब्ध झालेली आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून निधीही मिळाला, परंतु त्याला काही अडचणी आल्या. 
आता विद्यापीठाच्या निधीतून आणि राज्य शासनाकडून मिळणा:या निधीतून येथे इमारत उभी राहणार आहे. डीपीडीसीचा निधीही त्यासाठी घेतला जाणार आहे. याच उपक्रमाअंतर्गत ‘सिलेज’ अर्थात सीटी लाईक व्हिलेज उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील 100 गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात सौरउर्जा, शुद्ध पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन    तंत्रज्ञान, जैविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असणार आहे. 
याच अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र नंदुरबार येथे स्थापन केले जाणार आहे. याशिवाय तंत्रज्ञान प्रशिक्षण, कार्यशाळा, जनजागृती अभियान आणि क्षेत्र भेटी देखील असणार आहेत. याच अंतर्गत    सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत  पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा देखील प्रस्ताव असल्याचे         कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी सांगितले. 
यावेळी प्रा.डॉ.विजय शर्मा, प्रा.डॉ ए.टी पाटील, प्रा.डॉ.टी.ए मोरे, डॉ.एस.व्ही देवरे, डॉ.गरुड, प्राचार्य डॉ.विनोद श्रीवास्तव, प्राचार्य डॉ.डी.एस पाटील, प्रा.डॉ. सुनील कुवर, प्रा.डॉ.नरेंद्र गोसावी, मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.  

4विद्यापीठाच्या आदिवासी अकादमीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या 25 एकर जागेवर लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. 
बांधकाम आणि इतर कामांसाठी 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. पैकी 15 कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडूनही निधी उपलब्ध होणार आहे.
सिलेज प्रकल्पात बायफ संस्था, कृषी विज्ञान केंद्र, एमकेसीएल व बीआरसी यांचाही सहभाग आणि सहकार्य राहणार आहे.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला 40 पदे मंजुर झाली आहेत. लवकरच जाहिरात काढून ही पदे भरली जाणार आहेत. हा प्रकल्प ठराविक काळापुरता न राहता निरंतर चालणारा आहे. 
नवउद्योजक घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत  उद्योजक संसाधन केंद्र अर्थात स्ट्रेनची स्थापना नंदुरबारात केली जाणार आहे. 
 

Web Title: Launch of the University's 'Silage' project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.