तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:24 PM2018-02-18T12:24:00+5:302018-02-18T12:24:16+5:30

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून कारवाईचे सत्र सुरुच

Hiking farmers in Lodhi: Water scarcity due to power breakdown | तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकी असलेल्या गावांच्या पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत आह़े त्यामुळे तळोद्यातील ग्रामीण भागात आता पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आह़े पिकांना देण्यासाठी तर सोडाच पण जनावरांना पिण्यासाठीही पाणी नसल्याने आता ही जनावरे कोणाच्या दावणीला बांधावी? असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांकडून विचारण्यात येत आह़े 
शहादा उपविभागाकडून थकबाकीपोटी तळोदा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े त्यामुळे पाणी असूनही केवळ वीजेअभावी शेतक:यांना नमते घ्यावे लागत आह़े तळोदा तालुक्यातील एकूण 43 पाणीपुरवठय़ाची जोडणी खंडीत करण्यात आली आह़े 
ग्रा़पं़कडे मोठी थकबाकी
एकूण 1 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी या ग्रामपंचायतींकडे थकीत आह़े यात, प्रतापपूर, धनपूर, रोझवा, खेडले, त:हावद, गव्हाणीपाडा, खुषगव्हाण, लोभाणी, मोदलपाडा, बुधावल, सिव्रे, दलेलपुर, पिंपरपाडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलेला आह़े तालुक्यातील इतरही मोठय़ा गावाच्या पाणीपुरवठय़ाची वीजजोडणी खंडीत करण्यात आली असल्याने शेतक:यांसमोर पिक जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े 
शेतशिवारे पडली ओस.
ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती हा असतो़  त्यामुळे साहजिकच पाण्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतशिवारेदेखील आता ओस पडू लागली आहेत़ पाणीच नसल्याने शेतीची सर्व कामे ठप्प पडली आहेत़ तसेच पिकही पाण्याविना करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े 
पथदिव्यांचेही 5 कोटी थकीत
पाणीपुरवठय़ा व्यतीरिक्त पथदिव्यांचीदेखील 5 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी तळोदा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडे बाकी आह़े त्यामुळे पथदिव्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आली आह़े पाण्यासोबत आता गावातील वीजही गेली असल्याने शेतक:यांसमोर आता दुहेरी संकट निर्माण झाले आह़े 
ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्यास गावातील बहुतेक गावे हे अंधारात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े 
ग्रामपंचायतींमध्ये संभ्रम
मिळालेल्या माहितीनुसार वास्तविक वीज बिल जिल्हा परिषद भरत असत़े पण गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने बिल भरलेच नसल्याचे सांगण्यात येत आह़े म्हणून बहुतेक गावांना आता अंधारात राहण्याची वेळ येत आह़े 
दरम्यान, हे वीज बिल कोण भरणार यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावरुन दिसून येत आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन यातून मध्यममार्ग काढावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
 

Web Title: Hiking farmers in Lodhi: Water scarcity due to power breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.