बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी मांडला उच्छाद, दोघांवर कॉपी केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 04:50 PM2019-03-02T16:50:58+5:302019-03-02T16:51:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षण विभागाने अनेक उपाययोजना करूनही दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी नाकीनऊ आणले. ...

External copying: Exhortation, haircut copy | बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी मांडला उच्छाद, दोघांवर कॉपी केस

बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी मांडला उच्छाद, दोघांवर कॉपी केस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिक्षण विभागाने अनेक उपाययोजना करूनही दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी नाकीनऊ आणले. शिवाय अनेक केंद्रांवर आतूनही मोठय़ा प्रमाणावर कॉपी सुरू होती. दरम्यान, पहिल्या पेपरला जिल्ह्यात एकाही केंद्रावर कॉपी केस झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 
दहावीच्या पेपरसाठी जिल्ह्यात एकुण 43 परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रांवर एकुण 21 हजार 246 विद्याथ्र्याची सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच पेपरला मोठय़ा प्रमाणावर कॉपी चालली. बाहेरून कॉपी पुरविणा:यांना पोलिसांकडून चांगला चोप देखील देण्यात आला. 
प्रश्नपत्रिका लागलीच बाहेर
प्रश्नपत्रिका बाहेर पडू नये यासाठी शिक्षण विभागाने अनेक उपाययोजना केल्या. परंतु कॉपी पुरविणा:यांनी ती मिळवून लागलीच संबधीत प्रश्नांचे उत्तरे शोधून ती कॉपी पुरविण्यासाठी धडपड सुरू केली. अशा काही जणांकडून प्रश्न मिळविणे, त्याचे उत्तर शोधणे आणि त्याची ङोरॉक्स काढणे यासाठी अनेकांची धावपळ उडत होती. त्यात युवकांचा मोठा भरणा होता. 
नंदुरबार, शहादा येथील अनेक परीक्षा केंद्र हे मुख्य रस्ते व चौकांच्या परिसरात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बाहेरून कॉपी पुरविणा:यांच्या धावपळ आणि गर्दीमुळे वाहतुकीला वारंवार अडथळा देखील निर्माण होत होता. परिणामी पोलिसांना कसरत करावी लागत होती. 
अनेकांना शिक्षा
बाहेरून कॉपी पुरविण्याचा प्रय} करणा:या अनेकांना पोलिसांनी पकडून त्यांना जागेवरच दंडबैठकांची शिक्षा देण्यात आली तर काहींना लाठीचा प्रसाद देखील देण्यात  आला. तरीही कॉपी पुरविणा:यांचा उच्छाद थांबत नसल्याचे दिसून येते.
दोन विद्याथ्र्यावर कारवाई 
माध्यमिक शिक्षणाधिका:यांच्या पथकाने तळोदा येथील एका केंद्रांवर भेट देवून तेथील दोन विद्याथ्र्यावर कॉपी केस संदर्भात कारवाई करण्यात आली. आता थेट बोर्डाकडे ही माहिती पाठविली जात असते.  
पर्यवेक्षक बदली
एका शाळेचे दुस:या दुस:या शाळेवर अर्थात केंद्रांवर पर्यवेक्षक नियुक्तीचा प्रयोग बारावी प्रमाणे दहावी परीक्षेसाठी देखील करण्यात आला आहे. याबाबत काही शिक्षकांनी नाराजी तर काही शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. अंतर्गत कॉपीवर त्याचा बराच परिणाम दिसून आल्याची माहिती शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली.

Web Title: External copying: Exhortation, haircut copy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.