अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:41 PM2018-06-10T12:41:42+5:302018-06-10T12:41:42+5:30

मिशन अॅडमिशन : 186 तुकडय़ांमध्ये दाखल होणार विद्यार्थी

Eleventh entrance process offline | अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने

Next

नंदुरबार : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून  अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली आह़े जिल्ह्यातील 76 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होणारी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच होणार असून यातही उत्तीर्ण विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील मर्यादित जागा यामुळे पालक आणि विद्याथ्र्याची मोठी तारांबळ उडण्याची चिन्हे आहेत़ 
शुक्रवारी शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आल़े यात 383 शाळांमधून परीक्षा देणा:या 20 हजार 431 पैकी 16 हजार 497 विद्याथ्र्याना यश आल़े जिल्ह्याचा निकाल तब्बल 80़74 टक्के एवढा लागला आह़े जाहीर झालेल्या निकालात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्याथ्र्याची संख्या वाढल्याने मनपसंत ठिकाणी प्रवेश मिळवणे विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही जिकिरीचे होणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आह़े  नंदुरबार जिल्ह्यात 76 कनिष्ठ महाविद्यालये आहेत़ यात 53 अनुदानित असून 23 महाविद्यालये विनाअनुदानित आहेत़ सर्व 76 महाविद्यालयात 186 तुकडय़ांना मान्यता आह़े यातील 123 अनुदानित, तर 63 तुकडय़ा विनाअनुदानित आहेत़ या वर्गासाठी कला शाखेसाठी 8 हजार, विज्ञान वर्गात 6 हजार 800, वाणिज्य 680, तर संयुक्त 440 अशा 15 हजार 920 विद्याथ्र्याना प्रवेश दिला जाणार आह़े येत्या आठवडय़ात नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश प्रक्रियेसंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासन यांचे बैठक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आह़े 
जिल्ह्यात कला शाखेच्या 78, विज्ञान 32, वाणिज्य 9, तर संयुक्त 4 तुकडय़ा आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात 25, शहादा 15, नवापूर 9, तळोदा 4, अक्कलकुवा 3, तर धडगाव तालुक्यात 1 अशा 123 तुकडय़ा अनुदानित आहेत़ या तुकडय़ांचा प्रवेशासाठी प्राधान्याने विचार करण्यात येऊन मेरिटप्राप्त विद्याथ्र्याच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आह़े अर्ज भरणे, छाननी, तपासणी, सामान्य गुणवत्ता यादीचे प्रकाशन आणि नंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आह़ेएकीकडे विज्ञान वर्गासाठी विद्याथ्र्याची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे कला शाखेच्या शेवटच्या टप्प्यातील काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आह़े विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखेत पूर्ण क्षमतेने प्रवेश होत असतानाही जागा वाढलेल्या नाहीत़ जिल्ह्यात केवळ 680 विद्यार्थी वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊ शकतील अशी  सोय आह़े 
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 16 हजार 497 विद्याथ्र्यापेैकी विशेष प्रावीण्यासह 3 हजार 255 विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े प्रथम श्रेणीत 8 हजार 313, द्वितीय श्रेणीत 4 हजार 582, तर पास श्रेणीत यंदा केवळ 347 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गुणवत्तेत वाढ झाल्याने महाविद्यालयांमध्ये येत्या काळात झळकणा:या गुणवत्ता याद्या तयार करताना महाविद्यालयांनाही काळजी घ्यावी लागणार आह़े 
प्रवेश प्रक्रियेदरम्यान 15 हजार 920 जागा पूर्णपणे भरल्या गेल्यानंतरही 577 विद्याथ्र्याना प्रवेशासाठी झगडावे लागणार आह़े यात यंदा उत्तीर्ण झालेल्या 244 पुनर्परीक्षार्थीचाही समावेश असू शकतो़ सर्वच विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणार नसले तरी अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेणा:यांची संख्या आणि बाहेरगावी प्रवेश घेणा:यांची संख्या केवळ 1 टक्के राहणार आह़े यामुळे किमान 450 विद्याथ्र्याना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळेल किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आह़े जिल्ह्यात नंदुरबार 7, शहादा 5, नवापूर 2, तळोदा 6, अक्कलकुवा 5, तर तर धडगाव तालुक्यात 2 विनाअनुदानित तुकडय़ा आहेत़ यात स्वयंअर्थसहाय्यित 7, तर कायम विनाअनुदानित 1 वर्ग आह़े या तुकडय़ांमध्ये प्रवेश घेण्यासाठीही विद्याथ्र्याना कसरत करावी लागणार आह़े कला शाखेत 13, तर विज्ञान शाखेतील सर्वाधिक 42 विनाअनुदानित वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना बरीच धावाधाव करावी लागणार आह़े निकाल जाहीर झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून पालक शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चौकशी करत असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांमधून देण्यात आली आह़े ऑफलाइन पद्धतीने होणा:या प्रवेश प्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे कामकाज येत्या आठवडय़ापासून वेग घेणार आह़े 
 

Web Title: Eleventh entrance process offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.