पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:04 PM2019-07-23T12:04:29+5:302019-07-23T12:04:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन व काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पुरुषोत्तम पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ...

Discussion of Patil's entry into BJP | पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन व काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पुरुषोत्तम पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या संदर्भात तुर्तास कुठलाही निर्णय नसून आपण भाजप नेत्यांशी व्यक्तीगत कामासाठी भेट घेतली होती. त्याचा विपर्यास काढला जात असल्याचे स्पष्टीकरण दीपक पाटील यांनी केले आहे.   
सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांचे जिल्ह्यात कार्यकत्र्याचे मोठे    जाळे आहे. स्व.पी.के.अण्णा पाटील यांना मानणारा गट अजूनही मोठय़ा प्रमाणात असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दिपक पाटील यांचे महत्त्व आहे. 
या पाश्र्वभुमीवर गेल्या आठवडाभरापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याला विविध पुष्टी जोडली जात आहे. ही चर्चा सुरू असतांनाच दोन दिवसांपूर्वी दिपक पाटील यांनी मुंबई येथे भाजप कार्यालयात भेट दिल्याने चर्चेला अधीकच उधान आले आहे. 
या संदर्भात दिपक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले की, भाजप प्रवेशाचा तुर्तास कुठलाही निर्णय नाही. शहाद्यातील सहकार क्षेत्रात    कुठलाही निर्णय सामुहिकपणे घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय आपण एकटे घेवू शकत नाही. मुंबईला संस्थेच्या कामानिमित्त भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यात फक्त कामाची चर्चा झाली. इतर कुठलीही चर्चा झालेली नाही.
 

Web Title: Discussion of Patil's entry into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.