महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:06 PM2017-10-26T13:06:20+5:302017-10-26T13:06:20+5:30

शहादा उपविभागाची कारवाई : 800 कृषी पंपांचा वीजपुरवठा कापला

Disbursement of power supply to the defaulters from MSEDCL | महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : कृषी पंपाचे वीज बिल न भरल्याने महावितरणच्या शहादा उपविभागाकडून 800 कृषी पंप धारकांचे 36 विद्युत रोहित्रांवरील विज विजजोडणी खंडीत करण्यात आले आह़े अनेक वेळा सूचना देऊनही वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आह़े
शहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव असे चार तालुके येतात़ त्यात एकूण 23 हजार 369 कृषी पंपधारक आहेत़ त्यांच्याकडे एकूण 280 कोटी 65 लाख इतकी प्रचंड थकबाकी आह़े शहादा क्ऱ1 मध्ये एकूण ग्राहक 7 हजार 946 तर, थकबाकी 112 कोटी 4 लाख, शहादा क्ऱ2 मध्ये एकूण ग्राहक 7 हजार 532 तर थकबाकी 112 कोटी 66 लाख, अक्कलकुव्यात ग्राहक 1 हजार 747 तर थकबाकी 7 कोटी 26 लाख तसेच धडगाव येथे ग्राहक 576 तर थकबाकी 2 कोटी 6 लाख, तळोद्यात 5 हजार 568 ग्राहक तर थकबाकी 46 कोटी 61 लाख अशी एकूण 280 कोटी 65 लाख रुपयांची थकबाकी आह़े 
एवढय़ा मोठय़ा रकमेचे वीज बिल थकीत असल्याने याची वसूली करणे आता महावितरणसमोर आव्हान असल्याचे मानले जात आह़े दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरण कंपनीकडून थकबाकीदार शेतक:यांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आह़े ज्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आह़े, त्यांचे वीज भरणा भरल्या शिवाय पुन्हा वीज कनेक्शन करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े तसेच संबंधितांनी तालुक्यातील विभागीय कार्यालयात जाऊन लवकरात लवकर  बिले भरावे असा आवाहन महावितरणकडून करण्यात येत आह़ेदरम्यान ज्यांनी अजूनही बिले भरली नसतील त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े 
जमिनीची विक्री करुनही भरणा शक्य नाही
दरम्यान 280 कोटी रुपयांची थकबाकी म्हणजे साधी बाब नसल्याचे संबंधित शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े जमीन विकल्यावरदेखील थकबाकी भरता येणार नसल्याच्या हताश प्रतिक्रीया शेतक:यांकडून आता उमटताना दिसत आह़े त्यामुळे शासनाने ही थकबाकीची रक्कम माफ करावी अशी मागणी आता संबंधित शेतक:यांकडून करण्यात येत आह़े  परंतु महावितरणकडून याला नकार देण्यात आला आह़े ऐवढी मोठी रकमेची थकबाकी माफ करणे परवडणारे नसल्याचे महावितरणच्या अधिका:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे शेतक:यांना ही थकबाकी भरावीच लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े  
दरम्यान, या आधीदेखील संबंधित शेतकरी व महावितरणचे अधिकारी यांच्यात थकबाकीबाबत संघर्ष दिसून आला आह़े थकबाकी माफ करण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा शेतक:यांकडून मोर्चा आंदोलने करण्यात आली आहेत़ परंतु महावितरणचे अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वेळावेळी दिसून आले आह़े दरम्यान ही थकबाकी टप्प्या-टप्प्याने भरावी असाही पर्याय महावितरणकडून  खुला करुन देण्यात आला आह़े नापिकी  तसेच दुष्काळाशी दोन हात करणा:या शेतक:यांना ऐवढी रक्कम भरणे  शक्य नसल्याचे सांगण्यात येत आह़े 
दरम्यान, 800  कृषी पंपांची जोडणी खंडीत करण्यात आल्यामुळे आता शेतक:यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ आधिच पाण्याची चणचण असताना शेतक:यांना आता कृषी पंपाचाही आधार नसल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न आता निर्माण होत आह़े   

Web Title: Disbursement of power supply to the defaulters from MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.