शितलहरींमुळे नंदुरबारात थंडीचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:54 AM2018-12-13T11:54:42+5:302018-12-13T11:54:48+5:30

रब्बीला फायदा : नंदुरबारचे किमान तापमान 13.6 तर कमाल तापमान 29 अंशावर

Cold wave caused cold wave in Nandurbarita | शितलहरींमुळे नंदुरबारात थंडीचा जोर वाढला

शितलहरींमुळे नंदुरबारात थंडीचा जोर वाढला

Next

नंदुरबार : उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव वाढल्याने नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात गारठय़ात वाढ झालेली आह़े ‘आयएमडी’नुसार नंदुरबारात बुधवारी किमान तापमान 13.6 तर कमाल तापमान 29 अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले आह़े दिवसेंदिवस थंडीत वाढ होत असल्याने साहजिकच रब्बी पिकांना याचा फायदा होणार आह़े 
आठवडय़ापासून नंदुरबारात रात्रीच्या तापमानात मोठी घट बघायला मिळत आह़े तर दुपारी मात्र काही प्रमाणात तापमान जाणवत आह़े बुधवारी ब:याच दिवसांनी तापमान 30 अंश सेल्शिअसच्या खाली नोंदवले गेल़े पुढील काही दिवसांमध्ये नंदुरबारच्या तापमानात अधिक घट होऊन किमान तापमान 10 अंशाच्याही खाली जाण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तविण्यात येत आह़े 
बुधवारी नाशिकचे किमान तापमान 9 अंशावर पोहचले होत़े तर जळगाव व धुळे शहराचे किमान तापमान अनुक्रमे 12.8 व 14.9 अंशार्पयत खाली आले होत़े त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आह़े 
राज्यातील थंडीची परिस्थिती ही उत्तरेकडील राज्याच्या हवामानावर अवलंबून असत़े उत्तरेकडून येणा:या शितलहरींमुळे थंडीचा जोर वाढत असतो़
सध्या उत्तर-दक्षिण वा:यांचा वेग वाढलेला आह़े त्याच प्रमाणे  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उत्तरेकडून येणा:या वा:यांना कुठलाही अडथळा निर्माण होत नसल्याने परिणामी राज्यात ब:यापैकी थंडीचा जोर जाणवत आह़े
दुर्गम भागात थंडीचा जोर
सातपुडा, डोंगराळ तसेच दुर्गम भागात थंडीचा जोर अधिक जाणवत आह़े या ठिकाणी रात्रीच्या वेळी हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आह़े सातपुडा डोंगर रांगांमध्ये राहणा:या ग्रामस्थांना रात्री व पहाटेच्या वेळी घरातून बाहेर पडनेही कठीण होत आह़े अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, धडगाव आदी परिसरात समुद्र सपाटीपासून मोठय़ा प्रमाणात उंचावर घरे असल्याने या ठिकाणी गारठय़ात अधिक वाढ होत असत़े त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी घरे उबदार ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ त्याच प्रमाणे रात्री व पहाटेच्या वेळी शेकोटी पेटवून त्यावर आपले अंग शेकण्यात येत आह़े यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आह़े पावसाळ्यात कोरडय़ा दिवसांची संख्या अधिक असल्याने साहजिकच जमिनीत पाणी मुरले नाही व ओलावादेखील राहिला नाही़ त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा हिवाळ्यात पाहिजे तसा गारठा जाणवनार नसल्याचे भाकित हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आह़े डिसेंबर व जानेवारी हा महिना प्रखर हिवाळ्याचा समजला जात असतो़ चालू महिन्यातच किमान तापमान 10 अंशाच्या खाली घसरण्याचा अंदाज आता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढतो की आहे तसा कायम राहतो हे बघावे लागणार आह़े नंदुरबारातील शहरी भागात रात्री 10 नंतर तसेच सकाळी 9 वाजेर्पयत ब:यापैकी थंडीचा जोर जाणवत आह़े दुपारच्या वेळी काही प्रमाणात थंडी ओसरत़े त्यामुळे अनेक वेळा नागरिकांन संमिश्र वातावरणाचा अनुभव         घेता येत आह़े थंडीत काही प्रमाणात वाढ झाल्याने मॉर्निग वॉकसाठी जाणा:यांचीही संख्या आता हळूहळू वाढताना दिसून येत आह़ेजिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असल्याने रब्बी हंगामदेखील पूर्ण क्षमतेने घेतला जात आह़े गहू व हरभरा पिकासाठी जास्त थंडीची आवश्यकता असत़े थंडीचा जोर वाढल्याने गहू व हरभरा पिकाची पेरणी केली जात आह़े गव्हाच्या एकूण 21 हजार 123 हेक्टर क्षेत्रापैकी 8 हजार 490 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आह़े तर हरभ:याच्या एकूण 20 हजार 405 हेक्टर क्षेत्रापैकी 10 हजार 671 हेक्टर क्षेत्रावर हरभरा घेण्यात आला आह़े एकूण 16 हजार 33 हेक्टर क्षेत्रापैकी 5 हजार 240 हेक्टरवर ज्वारी घेण्यात आली आह़े
 

Web Title: Cold wave caused cold wave in Nandurbarita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.